शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

‘एक्साइज’मध्ये दुय्यम निरीक्षकांच्या २८८ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST

नांदेड : परवानाप्राप्त दारूची अधिकाधिक विक्री करणे, त्या माध्यमातून शासनाच्या तिजाेरीत महसूल जमा करणे, अवैधरीत्या हाेणारी दारूची निर्मिती व ...

नांदेड : परवानाप्राप्त दारूची अधिकाधिक विक्री करणे, त्या माध्यमातून शासनाच्या तिजाेरीत महसूल जमा करणे, अवैधरीत्या हाेणारी दारूची निर्मिती व विक्री राेखण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागात (एक्साइज) दुय्यम निरीक्षकांच्या तब्बल २८८ जागा रिक्त आहेत. या जागांवर पदाेन्नती मिळण्याची शेकडाे काॅन्स्टेबलला प्रतीक्षा आहे. एक्साइजमध्ये गेल्या काही वर्षांपासून पदाेन्नतीच झालेली नाही. २१ वर्षे सेवा हाेऊनही काॅन्स्टेबलच्या पदाेन्नतीचा मुहूर्त आयुक्तालयाला साधता आलेला नाही. पाेलीस दलातील उपनिरीक्षकाच्या बराेबरीचे एक्साइजमध्ये दुय्यम निरीक्षक हे पद आहे. तब्बल २८८ जागा रिक्त असल्याने उपलब्ध दुय्यम निरीक्षकांवर कामाचा ताण वाढताे आहे. इकडे एक्साइजमधील काॅन्स्टेबलची या पदावरील बढतीसाठी धडपड सुरू आहे. रिक्त जागांचा अंदाज घेऊन १६० व १२८ अशी एकूण २८८ सेवा ज्येष्ठ काॅन्स्टेबलची पदाेन्नती पात्रता यादी तयार करण्यात आली आहे; परंतु त्यातील आधी १६० ची यादी काढली जाणार आहे. तसे झाल्यास १२८ च्या यादीला पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या दाेनही याद्या एकत्रच काढल्या जाव्यात, असा एक्साइजच्या काॅन्स्टेबलमधील सूर आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप हे २८८ जागांवरील बढतीची एकत्र यादी काढतात का, याकडे नजरा लागल्या आहेत.

चाैकट....

अशा आहेत रिक्त जागा

२८८ पैकी दुय्यम निरीक्षकांच्या सर्वाधिक रिक्त जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत. पुणे ५०, सांगली ११, सातारा २२, काेल्हापूर १९, नगर ३३, साेलापूर २९, औरंगाबाद विभाग २३, बीड ४, उस्मानाबाद ५, परभणी ४, लातूर ३, हिंगाेली १, जालना २, नांदेड १०, ठाणे २०, रायगड ६, रत्नागिरी ४, नंदुरबार ५, धुळे २, जळगाव ११, नाशिक २९, सिंधुदुर्ग ३, आयुक्तालय १, मुंबई शहर १३, मुंबई उपनगरी २८, नागपूर २७, चंद्रपूर ६, यवतमाळ ४, अमरावती ४, अकाेला ७, वाशिम १, भंडारा ४, बुलडाणा १, गाेंदिया ३, वर्धा ३, तर गडचिराेली जिल्ह्यात २ जागा रिक्त आहेत. पूर्वी ४०० ची असलेल्या रिक्त पदांच्या या यादीत काही पदे भरली गेली आहेत.

चाैकट....

कार्यकारी पदांवर डाेळा

दुय्यम निरीक्षक पदावर बढती दिल्या जाणाऱ्या २८८ जागांपैकी अवघ्या काहीच जागा कार्यकारी पदावरील आहेत. त्यात तपासणी नाक्यांचाही समावेश आहे. वरकमाईच्या मानल्या जाणाऱ्या या कार्यकारी पदांवर वर्णी लावून घेण्यासाठी पदाेन्नतीच्या यादीतील अनेक काॅन्स्टेबलने आतापासूनच फिल्डिंगही लावली आहे.