चौकट-------------------
१२२१ जणांनी केली कोरोनावर मात
बुधवारी जिल्ह्यातील १२२१ जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील ३५, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील ६५, कंधार १०, किनवट २८, हिमायतनगर २२, माहूर ८, देगलूर ६, जिल्हा रुग्णालय ३९, नायगाव ११, बारड १०, अर्धापूर १०, मुदखेड २, बिलोली ११, आयुर्वेदिक महाविद्यालय ३७, हदगाव १५, धर्माबाद ८, उमरी ९, लोहा ५०, भोकर ४१ तर खासगी रुग्णालयातील ११९ जण कोरोनामुक्त झाले.
चौकट-२----------------------
कोरोना मृतांचा आकडा वाढताच
जिल्हा शल्य चिकित्सकांनी कळविलेल्या माहितीनुसार आणखी २८ रुग्णांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० जणांचा तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हदगाव येथील २, देगलूर येथील ३ तर मुखेड कोविड सेंटर येथे उपचार सुरू असलेल्या एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघांचे खासगी रुग्णालयात मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या २८ जणांपैकी दोन रुग्ण ५० वर्षाखालील असून उर्वरित २६ रुग्ण हे पन्नासहून अधिक वयाचे आहेत.