शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

जलसंधारणासाठी २७ गावांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:19 IST

मागील ७० वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त झाला नाही. राज्यातील नागरिकांनी स्थलांतर केले त्यात मराठवाड्यातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे़ या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जलयुक्तचा नारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : मागील ७० वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त झाला नाही. राज्यातील नागरिकांनी स्थलांतर केले त्यात मराठवाड्यातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे़ या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जलयुक्तचा नारा दिला. प्रत्येक गावातील नागरिक झपाटून पाणी चळवळीत सहभागी झाले. या योजनेत सहभाग घेणाऱ्या त्या २७ गावांत शासनाच्या वतीने जलसंधारण कामासाठी पाच लक्ष रूपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा कामगारमंत्री व कौशल्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.लोहा शहरातील कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाच्या मैदानावर शांतीदूत प्रतिष्ठाणच्या वतीने कै. व्यंकटराव मुकदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पाणीदार गावांचा व जलमित्रांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी निलंगेकर बोलत होते.अध्यक्षस्थानी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. विनायक पाटील जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, बाबा अमरजितसिंग, प्रवीण पाटील चिखलीकर, प्रणिता देवरे, चैतन्यबापू देशमुख, केरबा बिडवई, मिलिंद देशमुख, माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार आदींची उपस्थिती होती़यावेळी तालुक्यातील २७ गावांतील श्रमदात्यांचा तसेच जलमित्रांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छतादूत राजीव तिडके, लोहा-कंधार तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व पानी फाऊंडेशनचे समन्वयक तसेच कलंबर (खु), रायवाडी, निळा तसेच इतर २७ गावातील श्रमदात्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमास दत्ता वाले, शरद पवार, सभापती सतीश उमरेकर, केशवराव मुकदम, सुभाष गायकवाड, करीम शेख, गजानन सूर्यवंशी, जफरोद्दीन बाहोद्दीन, छत्रपती धुतमल, गणेश सावळे, नरेंद्र गायकवाड, व्ही.जी. कदम, भास्कर पवार, प्रभाकर कदम, बंडू वडजेंसह बहुसंख्येची उपस्थिती होती.२४ हजारपैकी १६ हजार गावे टँकरमुक्तनिलंगेकर म्हणाले, जलयुक्त व पानी फाऊंडेशनमुळे २४ हजारांपैकी १६ हजार गावे टँकरमुक्त झाले. त्यातील सर्वाधिक गावे ही मराठवाड्यातील आहेत. पाणी आडविणे व जिरविणे हे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याच्या खोºयात मुरले पाहिजे म्हणजे गावे पाणीदार होतील़ स्थलांतरित भागात पाणी व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोदी सरकारमुळे लाभार्थी व प्रशासनात असलेली दलाल पद्धत बंद झाली. लाभार्थ्याच्या बँक खात्यात अनुदान जमा होत आहे. असल्याचेही निलंगेकर म्हणाले़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी