शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
2
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
3
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
4
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
5
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
6
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
7
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
8
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
9
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
10
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
11
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
12
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
13
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
14
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
15
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
16
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
17
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
18
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
19
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
20
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

नांदेड एमआयडीसीत २२७ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा; अनेक भूखंड वापराविना पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 15:31 IST

भूखंडाचा विकास कालावधी संपत आलेला असला तरी त्याचा बिल्डिंग प्लान तयार केलेला नाही.

- रामेश्वर काकडे नांदेड :  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात शेकडो भूखंड रिकामे असून बहुतांश भूखंडांवर काही व्यावसायिकांनी वर्षानुवर्षांपासून ताबा घेतलेला आहे; परंतु अशा भूखंडांवर कोणताही उद्योग, व्यवसाय उभारलेला नसल्याने असे भूखंड अनेक वर्षांपासून वापराविना पडून असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम नांदेड एमआयडीसीत भूखंडाअभावी नवउद्योजकांच्या उद्योग उभारणीला ब्रेक लागला आहे.  

जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसायाला चालना मिळावी यासाठी त्यांना औद्योगिक वसाहतीमध्ये विविध  विकास कालावधीसाठी अल्पदरात रिकामे भूखंड शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतात. त्यावर बहुतांश उद्योजक उद्योग व्यवसाय सुरू करतात. मात्र, काही व्यावसायिकांकडून अनेक वर्षांपासून भूखंड आपल्या ताब्यात घेतल्यानंतरही कोणताच उद्योग व्यवसाय सुरू केलेला नाही.  त्याचा परिणाम इच्छुक व्यावसायिकांचे नवउद्योग जागेभावी ठप्प झाले आहेत.  भूखंड घेऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सदर जागेवर उद्योग व्यवसाय उभारला नसेल तर असे भूखंड परत घेतले जातात.  एमआयडीसीतील अनेक व्यावसायिकांनी भूखंड करारावर घेतलेले आहेत; परंतु भूखंडाचा विकास कालावधी संपत आलेला असला तरी त्याचा बिल्डिंग प्लान तयार केलेला नाही.  इमारतीचे बांधकामही केले नाही. त्याठिकाणी कोणती उद्योग व्यवसाय उभारला नाही.

रिकामे असलेले भूखंड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत वाटपासाठी उपलब्ध असलेले रिकामे भूखंड याप्रमाणे. नांदेड २२, कृष्णूर १५० देगलूर,  १८  कंधार ७, तर किनवट औद्योगिक वसाहतीत ३० भूखंड रिकामे आहेत.  ८०० ते ९०० हेक्टर क्षेत्रात औद्योगिक वसाहत आहे. 

धर्माबाद मारतळा भोकरमध्ये एमआयडीसी प्रस्तावित जिल्ह्यातील धर्माबाद येथे औद्योगिक वसाहत निर्माण करावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनधींकडून सातत्याने मागणी सुरू आहे,  त्यामुळे धर्माबादेत औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे, तर मारताळा येथेही औद्योगिक वसाहत प्रस्तावित असून, भोकर येथे एमआयडीसीची १४ हेक्टरवर वसाहत आहे.  सदर जागा महाराष्ट्र उद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असून, त्याठिकाणी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतर भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. 

एमआयडीसीनिहाय भूखंडाचे शुल्क जिल्ह्यातील पाच औद्योगिक क्षेत्रातील भूखंडासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते.  विशिष्ट कालावधीसाठी लीजवर दिलेल्या भूखंडाला औद्योगिक विकास महामंडाळाकडून नांदेड कार्यक्षेत्रात २४२० रुपये स्क्वेअर मीटर कुष्णूर उद्योगिक वसाहत २५० रुपये स्क्वेअर मीटर देगलूर कंधार व किनवट येथे २०० रुपये स्क्वेअर मीटर याप्रमाणे वार्षिक शुल्क आकारण्यात येते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीHingoliहिंगोली