शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

निधी १७ कोटी, कामे २५ कोटींचे!; नांदेड महापालिकेच्या प्रस्तावाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:07 IST

महापालिका हद्दीत दलितवस्ती विकासासाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला असला तरी तत्कालीन पदाधिकार्‍यांच्या शिफारशीने तब्बल २५ कोटींची कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. ही कामे बाजूला ठेवून नव्याने कामे प्रस्तावित केल्याची तक्रार मनपाचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

नांदेड : महापालिका हद्दीत दलितवस्ती विकासासाठी १६ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला असला तरी तत्कालीन पदाधिकार्‍यांच्या शिफारशीने तब्बल २५ कोटींची कामे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. ही कामे बाजूला ठेवून नव्याने कामे प्रस्तावित केल्याची तक्रार मनपाचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत नांदेड महापालिकेला १६ कोटी ८६ लाख रुपये प्राप्त झाले होते. या निधीतून तत्कालीन महापौर शैलजा स्वामी यांनी जवळपास २५ कोटींच्या कामाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविले होते. निधीपेक्षा जादा रक्कमेचे प्रस्ताव पाठविताना त्यांना कोणीही आडकाठी आणली नव्हती. 

दलितवस्ती निधीसंदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत या तक्रारी पोहोचल्या. या सर्व घडामोडीत निवडणुका लागल्या.  आयुक्त गणेश देशमुख यांनी पावसाळ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दलित वस्तीतून प्रामुख्याने शहरातील मोठ्या नाल्यांची कामे सुचवली. या कामांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मंजुरी दिली. मात्र पूर्वी  जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविलेल्या ठरावाचे काय झाले? असा प्रश्न रावत यांनी उपस्थित केला आहे. 

दलितवस्ती निधीतून ३१ कोटींची कामे मंजूरशहरात दलितवस्ती विकास निधीतून ३१ कोटींच्या कामांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष शहरात फिरुन ही कामे सुचवली आहेत.आवश्यक तीच कामे दलितवस्ती निधीतून घेण्यात  आली आहेत. या निधीतून कामे निश्चित करण्याचे अधिकार हे प्रशासनाचेच आहेत. आतापर्यंत पदाधिकार्‍यांनी त्याचा वापर केला. हा पायंडा मोडीत काढीत नियमानुसार काम करण्यात आले आहे. मंजूर झालेले प्रस्तावही नियमानुसारच आहेत. त्यात कोणताही बदल आता होणार नाही. - गणेश देशमुख, (आयुक्त, महापालिका) 

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिका