शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन बसेसच्या टक्करीत १६ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:22 IST

पुसदवरून माहूरला येणारी एस़टी़ बस धानोडा फाट्यावर प्रवासी उतरवत असताना यवतमाळवरून उमरखेड येथे जाणाऱ्या एस़टी़बसने उभ्या बसला मागच्या बाजूस जोराची धडक दिल्याने दोन्ही बसमधील एकूण १६ प्रवासी जखमी झाल्याची घटना ३ मे रोजी सकाळी ७़४५ वाजता माहूर-नांदेड रस्त्यावर माहूरपासून ७ कि़मी़ अंतरावर धानोडा फाट्यावर घडली़

ठळक मुद्देमाहूरपासून ७ किलोमीटर अंतरावरील धानोडा फाट्यावरील घटना जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले

श्रीक्षेत्र माहूर : पुसदवरून माहूरला येणारी एस़टी़ बस धानोडा फाट्यावर प्रवासी उतरवत असताना यवतमाळवरून उमरखेड येथे जाणाऱ्या एस़टी़बसने उभ्या बसला मागच्या बाजूस जोराची धडक दिल्याने दोन्ही बसमधील एकूण १६ प्रवासी जखमी झाल्याची घटना ३ मे रोजी सकाळी ७़४५ वाजता माहूर-नांदेड रस्त्यावर माहूरपासून ७ कि़मी़ अंतरावर धानोडा फाट्यावर घडली़पुसदवरून माहूरला येणारी बस (क्ऱ एम़एच़०६ एस़ ८३५३) या बसचे चालक माधव मस्के, वाहक निशिकांत बंडरप हे धानोडा फाट्यावर बस थांबवून प्रवासी उतरवत होते़ तेवढ्यात यवतमाळहून उमरखेडकडे जाणारी बस (क्ऱ एम़एच़४०-एक़्यू़ ६१०९) चे चालक प्रवीण मनवर यांना समोरची बस पुढे जात असल्याचा भास झाल्याने त्यांनी ब्रेक न लावल्याने बस समोरच्या बसला जाऊन मागच्या बाजूस धडकली़या धडकेत वाहक एस़एस़वळसे, प्रवासी दादाराव यलटवार (वय ६०़ रा दहिसावळी ता़आर्णी), मनोहर गुडडप (वय ६०, रा़आमनी ता़महागाव), अनिता मोतेपवार (४०, रा़किनी ता़ भोकर), प्रकाश मोतेपवार (४५), चंद्रकांत कुमरे (६०, रा़ आर्णी), साहिल कव्हाणे (१४, रा़अणशिंग, ता़वाशीम), प्रयागबाई चळतवार (४५, रा़दहिसावळी), गणेश दारमोडे (५०, रा़दहिसावळी), राजाबाई काळे (६०, रा़दारगव्हान), शशिकलाबाई इडतवाड (६०, दहीसावळी), मुरलीधर कांबळे (६६, रा़यवतमाळ), सुनील राठोड (३२, रा़सुकळी) हे जखमी झाले़ स्थानिक नागरिकांसह खासगी प्रवासी वाहतूक करणा-या वाहनधारकांनी बसमधील जखमींना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले़ येथे डॉ़अश्विन बोमकंटीवार, डॉ़निरंजन केशवे, डॉ़ए़डी़आंबेकर यांनी प्रथमोपचार करून तीन गंभीर जखमींना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठविले़ घटना कळताच आगारप्रमुख व्ही़टी़धुतमल, आऱजी़पाटील, एस़सीक़ातरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ तसेच प्रत्येक जखमीस ५०० रुपये नगदी स्वरूपात मदत केली़ घटनेची माहिती मिळाल्याने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, पो़ नि़ लक्ष्मण राख यांनी रुग्णालयात जाऊन जखमींवर सुरू असलेल्या उपचाराची व घटनेची माहिती घेतली़

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात