शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

हदगाव तालुक्यात १५ गावांच्या विहिरी आटल्या; बरडशेवाळा कालवा फुटल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:28 IST

बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या जानेवारीतच सुरू झाली आहे.

ठळक मुद्देहदगाव तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९६० मि़मी़ असताना ४६० मि़मी़ पाऊस झाला़बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या सुरु

हदगाव : बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या जानेवारीतच सुरू झाली आहे. हदगाव तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९६० मि़मी़ असताना ४६० मि़मी़ पाऊस झाला़ त्यामुळे नेहमीचे टँकरयुक्त गावे सोडून नदीकाठावरील गावांनाही पाणीटंचाईने आपल्या पाशात ओढले आहे़  नदी-नाले यावर्षी भरलेच नाहीत़ पडलेला पाऊस शेताबाहेरही निघाला नाही़ त्यामुळे रबी पिकांनाही फटका बसला़ बोंडअळीने कापूस खाल्ला तर सोयाबीनला करप्या रोगाने उद्ध्वस्त केले़ हरभरा व गहू पिकासाठी वातावरण पोषक असतानाही पाण्यामुळे गहू पिकाचा पेरा कमी झाला.

हरभरा पिकाचा पेरा दरवर्षी पेक्षा यावर्षी वाढला़; पण इसापूर धरणात १३ टक्केच पाणी असल्याने रबी पिकांना तीनऐवजी एकच पाणी पाळी करण्यात आली़ पाणी पिकांना मिळण्याऐवजी बरडशेवाळा कालवा फुटल्याने नाल्यामध्येच वाहून गेले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल. कालव्याच्या दुरुस्तीचे काम आता हाती घेण्यात आले, दुरुस्तीही होईल, एक पाणीपाळी पुन्हा मिळेलही, मात्रही पाणीपाळी पिकांसाठी उशिरा ठरणारी आहे. अनेकांचा हरभरा काढणीला आला.

दरम्यान, बरडशेवाळा कालवा परिसरातील गावे पाण्याने व्याकूळ  झाली. कालव्याचे पाणी वाहून गेल्याने परिसरातील बरडशेवाळा, उंचाडा, नेवरी, तालंग, नेवरवाडी,  पळसा, अंबाळा, कोथळा, गोर्लेगाव,  बेलमंडळ, वाटेगाव आदी गावांत आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. या कालव्याला ७ जानेवारी रोजी पाणी सोडले होते़ ते शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी ८-१० दिवस लागत होते़ त्यामुळे या परिसरातील विहिरींना पाणी राहिले असते; पण ८ जानेवारी रोजी कालवा फुटला़ काम करण्यासाठी पाणी बंद केले़ आज १२ दिवस उलटले तरी काम पूर्ण झाले नाही़ त्यामुळे विहिरींनी तळ गाठला़ नदीकाठी असलेले खाजगी बोअरही मुकळ्या टाकीत आहेत़ मनाठा, कनकेवाडी, सावरगाव, वडगाव, चिंचगव्हाण, शिवपुरी या गावाना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा होतो.  या गावांना पाणी देण्यासाठी ज्या विहिरी, बोअरचे खाजगीकरण करण्यात येते. त्या नदीकाठच्या गावचेच पाणी आटल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे टाकले आहे़  कालव्याचे काम आटोपून पाणी सोडल्यास या गावातील पाणीटंचाई समस्या काही प्रमाणात सुटू शकते़ 

कणकेवाडीत भटकंतीहदगाव तालुक्यातील कणकेवाडी येथील पाणीयोजना कुचकामी ठरल्याने मागील पंधरा दिवसांपासून गावात पाणीटंचाई आहे. शिवप्रसादनगरतांडा व वाडी मिळून कणकेवाडी ग्रामपंचायत २००५ मध्ये अस्तित्वात आली. यापूर्वी गावातील बोअर, हातपंपाला मुबलक पाणी होते. मात्र गेल्या चार- पाच वर्षांपासून जून-जुलैपर्यंतही पाणीटंचाई असते. तांडावस्तीचा निधी खर्चून नळयोजना करण्यात आली, मात्र ती कुचकामी ठरली. पाणीटंचाईच्या बैठकीत उपसरपंच प्रकाश राठोड यांनी आ. आष्टीकर यांच्याकडे टँकरची मागणी केली होती, मात्र अद्याप टँकर सुरु झाले नाही. गावकर्‍यांना आता १ कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे.

इसापूर धरणात केवळ १३ टक्के पाणी हरभरा पिकाचा पेरा दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढला.इसापूर धरणात पाणी १३ टक्केच असल्याने रबी पिकांना मिळणार्‍या पाणीपाळ्या तीनऐवजी एकच करण्यात आली.परंतु तीही शेतकर्‍याच्या पिकांना मिळण्याऐवजी बरडशेवाळा कालवा फुटल्याने नाल्यामध्येच सात हजार क्युमेक्स पाणी वाहून गेले. यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले.आता काम झाल्यानंतर एक पाणीपाळी मिळेलही़ परंतु पिकासाठी ही पाणीपाळी उशिरा ठरली.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी