शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे ११८ कोटी अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:32 IST

नांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत मिशन’ : आणखी ११२ कोटींची आवश्यकता

गोविंद सरदेशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ९८ हजार लाभार्थ्यांना वर्ष २०१७- २०१८ मध्ये शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना ११८ कोटी रूपये अनुदान वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ९० हजार लाभार्थ्यांना अजूनही अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये आतापर्यंत जवळपास ९८ लाभार्थ्यांना ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.यामध्ये अर्धापूर तालुक्यासाठी २४ लाख ८४ हजार, भोकर - ३ कोटी ५ लाख २८ हजार, बिलोली तालुक्यासाठी ४ कोटी ३० लाख ८ हजार रूपये, देगलूर तालुका- ८ कोटी ६० लाख २८ हजार, हदगाव तालुका - १५ कोटी २० लाख ४० हजार, हिमायतनगर - ७ कोटी ८५ लाख २८ हजार रूपये, कंधार तालुका - १४ कोटी २५ लाख ४८ हजार, किनवट - १६ कोटी ४५ लाख ४४ हजार रूपये तसेच लोहा तालुक्यात १० कोटी ६० लाख ४४ हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे माहूर तालुक्यात ७ कोटी ३२ हजार रूपये, मुखेड - ११ कोटी ४० लाख, नायगाव तालुका - ६ कोटी ६० लाख २४ हजार, उमरी - ६ कोटी ७ लाख ३२ हजार तर नांदेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रूपये असे एकूण जिल्ह्यात ११८ कोटी १ लाख १६ हजार रूपयांचे शौचालय बांधकामासाठीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.दरम्यान, पायाभूत सर्व्हेक्षणात जिल्हा नुकताच पाणंदमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जि.प. च्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांचा नुकताच सत्कार करण्यात आला होता.तालुकानिहाय पूर्ण झालेले शौचालय बांधकामअर्धापूर तालुका- ११ हजार ८१३, भोकर - १८ हजार ३२२, बिलोली - २३ हजार ५५७, देगलूर - २८ हजार ५८६, धर्माबाद - ११ हजार ५८२, हदगाव तालुका- ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट तालुका - ४१ हजार ४३, लोहा - ३६ हजार ६२३, माहूर तालुका - १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव तालुका - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यात १५ हजार ९०५ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.आणखी ११२ कोटी निधीची आवश्यकतादरम्यान, जिल्ह्यातील जवळपास ९० हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अजूनही अनुदान प्राप्त झाले नाही. त्यासाठी आणखी अंदाजे ११२ कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानfundsनिधी