मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ८ केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या ८ केंद्रावर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस याठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल.
या व्यतिरिक्त कोव्हॅक्सिन ही लस दोन्ही गटासाठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर) येथे प्रत्येकी १०० डोस, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात ९० डोस, श्री गुरुगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, जंगमवाडी, सिडको येथे प्रत्येकी ७० डोस, शिवाजीनगर व दशमेश या केंद्रावर ५० डोस उपलब्ध आहेत.
उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १६ केंद्रावर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दिले जातील.
उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव व उमरी या १५ केंद्रावर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध असून ही लस ४५ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल.