शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बिलोली तालुक्यातील बोळेगावात कॅन्सरचे १० रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:27 IST

येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

ठळक मुद्देगावात भीतीचे वातावरण आरोग्य विभागासमोर मोठे आव्हानआरोग्याधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

सगरोळी : येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.बोळेगाव हे दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे गाव. येथील गावातील सर्वच नागरिकांना मांजरा नदीचे, बोअरवेलचे पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. पाणीपुरवठाही सुरळीत होतो. मात्र गत अनेक वर्षांपासून पाणीनमुने तपासण्या करण्याकडे ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तेलंगणा रॉयल सीमेवरचे गाव असल्याने अनेक नागरिक शिंदी, दारू, विडी, सिगारेट व गुटख्याच्या व्यसनात ओढले गेले आहेत.या गावापासून तीन कि.मी.अंतरावर सगरोळीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर १२ कि.मी.वर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त बिलोली ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालय आहे. गावात दोन अंगणवाड्या असून गरोदर माता, कुपोषित माता व बालके, किशोरवयीन मुलींची तपासणी व आहारविषयी सूचना वेळोवेळी दिल्या जात असल्या तरी यांना कॅन्सर- सारख्या जीवघेण्या रोगाचे रूग्ण आढळले नाहीत. याबाबत या भागात आश्चर्य व्यक्त होत आहे. मांजरा नदीकिनाºयावर वसलेल्या सगरोळी परिसरासह बोळेगावात बºयाच प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे येथील जमीन ओलिताखाली असून या भागात रबी व खरीप हंगामातील पिके व भात (साळ) पिकाबरोबरच भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.फूलकोबी, पानकोबी, गड्डाकोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, दोडके, भेंडी यासह विविध फळभाज्या तसेच पालेभाज्या, बिलोली, सगरोळी, बोधन, नायगाव, कुंडलवाडी, कासराळी, देगलूर आदी आठवडी बाजारात विकल्या जातात. कमी काळात जादा उत्पादन घेण्याबरोबरच कीड लागू नये म्हणून, या भाज्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारले जातात. त्याचा फटका मात्र नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. त्यासाठी या भागातील माती व पाण्यात नेमके कोणते विषारी घटक आहेत. त्याचे प्रमाण किती आहे? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? कोणते कीटकनाशके घातक आहेत हे तपासणे गरजेचे आहे. यावर काही उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. बोळेगावातील कॅन्सरचे रुग्ण सध्या बार्शी तर काही मुंबई येथील कॅन्सरसाठी प्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.अलीकडेच मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.असं काही होईल असे वाटलेच नव्हते. सतत जाणवणाºया त्रासामुळे काही चाचण्या बार्शी येथील दवाखान्यात करवून घेतल्या आणि त्यातून कॅन्सरचे दुखणे समोर आले. माझी पत्नी, माझ्या मुलींनी धीर दिला. माझ्या कुटुंबियाच्या प्रेमावर मी कॅन्सरशी लढा देणार आहे - राम शिरगिरे बोळेगाव (बार्शी रूग्णालयात उपचार चालू असलेले रूग्ण.)लवकरात लवकर उपचार सुरू करणे हा एकमेव उपाय आहे आणि आम्ही तेच केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी सध्या मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आम्ही आशावादी आहोत. कॅन्सरविरूद्ध लढा देण्याचा निर्धार केला. या काळात माझे पती मोलमजुरी करून माझ्या आजारावरील उपचाराचा खर्च करीत आहेत -राधाबाई शिवाजी कोंडापल्ले बोळेगाव (टाटा मेमोरियल मुंबई येथे उपचार घेत असलेले रूग्ण.)चार ते पाच महिन्यांपूर्वी सगरोळी येथे एक कॅम्प झाला होता. त्या कॅम्पमध्ये कॅन्सरचे रूग्ण आढळून आले नाहीत. कदाचित कॅन्सर रूग्ण दुसºया ठिकाणी उपचार करीत असतील त्यामुळे असे कॅम्पमध्ये दाखल झाले नाहीत. त्यामुळे या भागात कॅन्सर रूग्ण आहेत किंवा नाहीत हे निश्चित सांगणे कठीण आहे -डॉ. वाडेकर, आरोग्य अधिकारी बिलोली

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यcancerकर्करोग