शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त झिरो पेंडेन्सी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:12 IST

प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात.

ठळक मुद्देमहिन्याच्या अखेरीस सादर करावा लागणार अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासन गतिमान असेल, तर जनतेच्या समस्याही सहज मार्गी लागतात. परंतु जि.प. सारख्या प्रशासकीय यंत्रणेच्या बाबतीत जनतेच्या प्रतिक्रिया फारशा समाधानकारक नाही. कारण यंत्रणाच गतिमान नसल्याने, कामेच वेळेत होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे आता जि.प.च्या सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सामान्य नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जिल्हा परिषद व अंतर्गत येणाºया प्रशासकीय यंत्रणेत झिरो पेंडेन्सी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेचा थेट संबंध ग्रामीण भागातील नागरिकांशी येतो. नागरिकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करून कामासाठी जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयात यावे लागते. अधिकाºयांकडून संबंधित विषयाची फाईल हाताळण्यात येत नसून विविध कारणे दाखविण्यात येतात. यामुळे प्रलंबित प्रकरणाच्या फाईल्सचा ढिगारा वाढत आहे. जिल्हा परिषदेत हजारांवर फाईल्स प्रलंबित असेल. याचा विकास कामावरही परिणाम होतो. शिवाय जिल्हा परिषदबाबत नागरिकांकडून चांगला संदेश जात नाही. जिल्हा परिषदेची ही प्रतिमा पुसण्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘झिरो पेंडेन्सीह्ण अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी सीईओ डॉ. बलकवडे यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी सर्व प्रमुखांना प्रलंबित फाईल्स मुदतीत निकाली काढण्याच्या सूचना केल्या. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर सर्व बीडीओ आणि विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहे. यात त्यांच्याकडे असलेल्या प्रलंबित प्रकरणाची माहिती घेऊन त्या निकाली काढण्यासाठी मुदत निश्चित करण्यात येणार आहे. कर्मचाºयांवर असलेला ताण लक्षात घेता ही मुदत ठरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवीन प्रकरणही निकाली काढण्याची मुदत निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला सीईओ डॉ. बलकवडे याचा अहवाल घेणार आहे.