शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवटीत जि.प. निवडणुकीची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 20:45 IST

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्यास सकारात्मकता दाखविली आहे. मात्र अशात राज्यात सरकार स्थापन झाले नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देआयोगाची तयारी जोरात, फक्त घोषणेची प्रतीक्षा : जिल्हा परिषदेत चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर संकटाचे सावट थांबता थांबत नसल्याचे दिसते आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्यास सकारात्मकता दाखविली आहे. मात्र अशात राज्यात सरकार स्थापन झाले नसल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धाकधूक वाढली आहे.राज्यात नागपूरसह पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहे. आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीची प्रक्रिया अडकली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीची लोकसंख्या राज्य सरकारकडून मागितली होती. पण राज्य सरकार लोकसंख्येची माहिती अद्यापही देऊ शकले नाही. त्यामुळे २० नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला हिरवी झेंडी दिली आहे. आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. सर्कलची पुनर्रचना व आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. औपचारिकता म्हणून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी आहे. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील, अशी सर्वांना अपेक्षा आहे. मात्र सध्या राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांनी अस्थिर वातावरण निर्माण केले आहे. सरकार कुणाचे आणि कधी बसेल याबाबत कुठलेही स्पष्ट संकेत नाही. अशात राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावली आहे. सत्तेच्या गुंतागुंतीत अख्खे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे निवडणुका होतील की नाही? अशी चर्चा जि.प.मध्ये सुरू झाली आहे. सरकार असल्या नसल्याशी निवडणुकीचा काही संबंध नाहीयासंदर्भात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांचे म्हणणे आहे की, राज्य निवडणूक आयोग निवडणुकीच्या तयारीत आहे. निवडणुकीच्या संदर्भात प्रशासकीय प्रक्रियाही सुरूच आहे. न्यायालयीन प्रक्रियेत काही बाबी अडकलेल्या आहे. त्यामुळे वेळ झालेलाच आहे. सरकार असल्या नसल्याशी अथवा राष्ट्रपती राजवट लागली तरी, निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नाही. सरकारच नसल्यामुळे आचारसंहितेत ढवळाढवळीचा प्रश्नही राहिला नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकPresident Ruleराष्ट्रपती राजवट