शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

स्मार्ट सिटीसाठी झोनस्तरावर सर्वे

By admin | Updated: September 19, 2015 03:49 IST

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागपूर शहराची निवड झाल्यानंतर महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे.

नागपूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागपूर शहराची निवड झाल्यानंतर महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. आता पायाभूत सुविधांच्या आधारावर वस्त्यांची निवड केली जाईल. यासंबंधीची एक यादी तयार केली जाईल. ज्या भागात पायाभूत सुविधा नाहीत तेथे प्रथम विकास कामे केली जातील. या प्रकल्पाच्या तयारीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी विभाग प्रमुख व झोनच्या सहायक आयुक्तांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पायाभूत सुविधांच्या आधारावर वस्त्यांची यादी तयार करावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. या अंतर्गत गरीब, अत्यंत गरीब व झोपडपट्टी अशी यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्वप्रथम शहरातील त्या भागांचा विकास केला जाईल जेथे पायाभूत सुविधा उदा. रस्ते, गटारी, पथदिवे, उद्यान आदी नाहीत. संबंधित यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे नेमके काय असेल हे अद्याप सर्वसामान्य माणसाला समजलेले नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील प्रत्येक भागात पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. शहराचा समान व एकत्रित विकास या प्रकल्पांतर्गत करायचा आहे. या प्रकल्पासोबतच अनेक उपक्रमही राबविले जातील. स्मार्ट सिटी स्पर्धेत दीड हजाराहून अधिक सूचना आल्या आहेत. त्यांची छाननी करून अंतिम २० सूचनांची निवड केली जाईल. तज्ज्ञांची समिती त्यातून दहाची निवड करेल. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. (प्रतिनिधी)