शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

झुलेलालच्या भागीदारांना जामीन

By admin | Updated: May 20, 2017 02:53 IST

नारा येथील ३६ कोटी रुपये किमतीची नऊ एकर जमीन हडपल्याप्रकरणी झुलेलाल डेव्हलपर्सच्या

३६ कोटी रुपयांची जमीन हडपल्याचे प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नारा येथील ३६ कोटी रुपये किमतीची नऊ एकर जमीन हडपल्याप्रकरणी झुलेलाल डेव्हलपर्सच्या दोन आरोपी भागीदारांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. ए. तिवारी यांच्या न्यायालयाने गुरुवारी प्रत्येकी १५ हजाराचा जात मुचलका आणि तेवढ्याच रकमेच्या दोन हमीवर सशर्त जामीन मंजूर करून सुटका केली. ओमप्रकाश गोकुलदास बजाज आणि सुखदेव प्रेमचंद भागचंदानी, अशी आरोपींची नावे आहेत. जरीपटका येथील रोशन मिनहलदास जोधानी, टिकमदास निथलदास मोटवानी, ओमप्रकाश गोकुलदास बजाज, सुखदेव प्रेमचंद भागचंदानी आणि प्रकाश दयाल आसुदानी यांनी ५ एप्रिल १९९९ रोजी झुलेलाल डेव्हलपर्स नावाच्या फर्मचे भागीदारपत्र तयार केले होते. या भागीदारांनी कमलेश लक्ष्मणलाल जयस्वाल आणि इतर चार, अशा पाच जणांकडून नारा येथील नऊ एकर जमीन सहा खरेदी खताद्वारे विकत घेतली होती. एप्रिल २००० मध्ये या जमिनीच्या मालकांच्या नातेवाईक उषा लाला जयस्वाल आणि इतरांनी जमीन खरेदीदारांविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने २६ जून २००६ रोजी ‘जैसे थे’चा आदेश दिला होता. प्रकरण न्यायालयात असताना ओमप्रकाश बजाज आणि सुखदेव भागचंदानी यांनी या जमिनीचे सर्व अधिकार जयप्रकाश गोकुलदास बजाज याला ६ डिसेंबर २००५ रोजी आममुख्त्यारपत्र तयार करून दिले होते. या आममुख्त्यारपत्राचा गैरवापर करून जयप्रकाश बजाज याने झुलेलालच्या इतर भागीदारांना अंधारात ठेवून ही जमीन स्वत: आणि त्याचा भाऊ सुरेश गोकुलदास बजाज यांना २३ लाख ९४ हजार रुपयात विकल्याचा खोटा व बनावट खरेदीखताचा दस्त तयार करून या दस्ताची नोंद महाल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करून ३६ कोटींची ही जमीन हडपली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन एकूण सात जणांना आरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी ओमप्रकाश बजाज आणि सुखदेव भागचंदानी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक करून त्यांचा एक दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयात आरोपीच्यावतीने अ‍ॅड. कैलाश डोडानी, अ‍ॅड. प्रकाश रामरक्षियानी आणि अ‍ॅड. हितेश खंडवानी यांनी काम पाहिले.