शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निधी वाटपावरुन न्यायालयात जाण्याच्या तयारीत; सभागृहाच्या प्रोसिडींगनंतर निर्णय

By गणेश हुड | Updated: March 6, 2024 20:00 IST

दहा ते वीस लोकसंख्येच्या काही गावांना छदामही नाही

नागपूर : शासन निर्णयानुसार प्रस्तावित कामाचा ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय कामांना मंजुरी मिळत नाही. ग्रामसभांचे ठराव नसताना काही गावांना जन सुविधा व नागरी सुविधांचा कोट्यवधीचा निधी देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हयातील दहा ते वीस हजार लोकसंख्येच्या अनेक गावांना छदामही मिळाला नाही. निधी वाटपातील भेदभावामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत असल्याने या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

जिल्हा नियोजन समितीने  कामांची यादी मंजूर करताना  जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रस्तावांना डावलण्यात आले. आमदारांच्या व स्थानिक नेत्यांच्या  सूचनेनुसार  जनसुविधा व नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत केला होता.  शासन निकषानुसार मंजूर नियतव्याच्या दिड पटीचे जिल्हा परिषद सदस्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी नियोजन समितीकडे पाठविण्यात आले होते. परंतु सदस्यांची यादी डावलण्यात आली. नियोजन समितीने दुसऱ्या यादीला मंजुरी दिली. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत तांत्रिक मंजुरी न देण्याचे निर्देश अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी दिले. उपाध्यक्ष कुंदा राऊत व महिला बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी शासन निर्णयानुसार निधी वाटप न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.मंजूर नियतव्ययाच्या दिडपटीहून अधिक प्रस्ताव कसे?विकास कामांसाठी मंजूर असलेल्या नियतव्याच्या दिड पट प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविणे अपेक्षित होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या सर्कलमधील कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पाठविला होता. दुसरीकडे आमदार व काही नेत्यांच्या सूचनेवरून नियोजन समितीकडे परस्पर प्रस्ताव पाठिवण्यात आले. आधिच दिडपट रकमेचे प्रस्ताव पाठवले असताना अधिक रकमेचे प्रस्ताव कुठल्या कायद्यानुसार पाठविण्यात आले. असा प्रश्न जि.प.पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.७० टक्के ग्रामपंचायतींचे ठरावच नाहीजनसुविधा  व नागरी सुविधांतील विकास कामांचे प्रस्ताव ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय मंजूर करता येत नाही. परंतु जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या ५० कोटींच्या कामापैकी ७५ टक्के ग्रामपंचायतींनी ठरावच पाठिवलेले नाही. अशा जनसुविधा व नागरी सुविधांच्या कामांना मंजुरी कशी देण्यात आली. असा प्रश्न जि.प.अध्यक्ष् मुक्ता कोकडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर