शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरवर शून्य सबसिडी; स्वस्त दराचा फायदा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 10:44 IST

मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बेस रेट ५९० रुपयांवर आल्याने या महिन्यात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकार सिलिंडरवर १२० रुपयांची कमाई करीत आहे.

ठळक मुद्देमे महिन्यातील सबसिडीवर केंद्र सरकारची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मे महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत बेस रेट ५९० रुपयांवर आल्याने या महिन्यात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि गॅसच्या किमतीत प्रचंड घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकार सिलिंडरवर १२० रुपयांची कमाई करीत आहे. सरकारने नफ्यातील काही हिस्सा ग्राहकांच्या खात्यात ट्रान्सफर करावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.केंद्र सरकारने जानेवारी २०१५ मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना सुरू केली होती. या योजनेनुसार ग्राहक एलपीजी सिलिंडरची पूर्ण किंमत चुकते करतात. त्यानंतर सरकार त्यांची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करते. यापूर्वी तेल कंपन्या ग्राहकांना गुंतवणुकीच्या कमी किमतीत एलपीजी सिलिंडर विकत होती आणि होणाऱ्या नुकसानीची भरपाई सरकारतर्फे करण्यात येत होती. परंतु सरकारने या सिस्टीममध्ये बदल करीत आॅक्टोबर २०१७ आणि जुलै २०१९ दरम्यान बिगर-सबसिडीच्या सिलिंडरची किंमत स्थिर केली.तेल कंपन्यांच्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज चढउतार होत असतो. पण कंपन्यांनी उतरत्या किमतीचा फायदा ग्राहकांना होऊ न देता तब्बल ६३ दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. याशिवाय तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या दिवशी रात्री १२ वाजता एलपीजी सिलिंडरच्या किमतीत चढउतार करीत असते. त्यानुसार एप्रिल महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ७९९.५० रुपये होती. त्यात ग्राहकांना १९९.५० रुपये सबसिडी मिळाली होती. पण ३० एप्रिलच्या मध्यरात्री तेल कंपन्यांनी सिलिंडरचे भाव १९९.५० रुपयांनी कमी केले. त्यामुळे भाव ५९९ रुपयांवर आले. कंपन्यांनी ठरविलेल्या ५९९ रुपये या बेस रेटपेक्षा भाव जास्त असेल तरच ग्राहकांना सबसिडी देण्याचे धोरण असल्याची माहिती आहे. त्यानुसार भाव ५९९ रुपयांवर आल्याने मे महिन्यात सबसिडी ग्राहकांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली नाही. तेल कंपन्यांना कच्चे तेल आणि गॅस अत्यंत स्वस्त दरात मिळत आहे. त्याचा फायदा ग्राहकांना न होता तेल कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत आहे. प्रक्रियेनंतर तेल कंपन्यांना गॅस स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. या किमतीतही कंपन्या १२० रुपयांचा नफा कमवीत आहे. कंपन्यांनी नफ्यातील काही हिस्सा ग्राहकांना ‘पास ऑन’ करावा, असे सूत्रांनी सांगितले.

जून महिन्यात मिळेल सबसिडी?गेल्या काही महिन्यांपासून सरकारने घरगुती ग्राहकांसाठी बिगर-सबसिडीच्या सिलिंडरचे भाव वाढविले होते. एकीकडे सरकारने भाव वाढविले होते, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस स्वस्त झाला होता. त्याचा फायदा मिळावा, असे ग्राहकांचे मत आहे. भारत गॅसचे वितरक सतीश एन्टरप्राईजेसचे संचालक सतीश भोयर म्हणाले, मे महिन्यात ग्राहकांना सबसिडी मिळाली नाही, हे खरं आहे. पण एलपीजी गॅस सिलिंडरच्या बेस रेटनुसार सबसिडी ट्रान्सफर करण्यात आली आहे. कंपन्यांच्या धोरणानुसार एजन्सी काम करते. जून महिन्यात भाव वाढल्यास ग्राहकांना सबसिडी मिळेल.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर