शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

सूर्य मे महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर

By निशांत वानखेडे | Updated: April 30, 2024 16:58 IST

खगाेलीय हालचालींचा असाही संबंध : ३ ते ३१ मे पर्यंत वेगवेगळ्या शहरात शुन्य सावली

नागपूर : मे महिन्यात तसाही उन्हाचा तडाखा अत्याधिक तीव्र असताे. तस ताे का असताे, यामागे खगाेलीय हालचाली कारणीभूत आहेत. सूर्य सध्या दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत आहे, म्हणजे उत्तरायण सुरू आहे. आता ताे कर्कवृत्आच्या जवळपास असून २१ जून राेजी बराेबर कर्कवृत्तावर असेल, जिथून परत दक्षिणायण सुरू हाेईल. संपूर्ण महाराष्ट्र हा कर्कवृत्ताच्या खाली आहे. आपल्या अक्षवृत्तीय स्थितीनुसार ३ मे पासून सूर्य बराेबर महाराष्ट्राच्या डाेक्यावर असेल.

खगाेलीय अभ्यासक प्रभाकर दाैड यांनी सांगितले, अगदी डाेक्यावर असल्याने सूर्याची तीव्रता अधिक प्रखरतेने जाणविणार आहे. त्यानुसार ३ ते ३१ मे या कलावधीत सूर्य डाेक्यावर असेल आणि अक्षवृत्तीय स्थितीनुसार वेगवेगळ्या शहरात नागरिकांना शुन्य सावलीचा अनुभव घेता येईल. नागपूर शहरात २६ मे राेजी तर अकाेल्यात २३ मे राेजी शुन्य सावलीचा अनुभव घेता येईल. अशी घटना केवळ मकरवृत्त ते कर्कवृत्त या भागात घडून येते. मध्य प्रदेशच्या भाेपाळ शहरातून कर्कवृत्ताची रेखा गेली आहे. त्यामुळे भाेपाळसह, रांची, झाशी आदी शहरातही शुन्य सावली अनुभवता येईल. २१ जून राेजी सूर्य कर्कवृत्तावर पाेहचल्यानंतर २२ जूनला दक्षिणेकडे परत फिरेल. त्यामुळे नागपूरकरांना १७ जुलै राेजी पुन्हा शुन्य सावलीची घटना घडेल पण पाऊस असल्यास ती अनुभवता येणार नाही.

उन्हाळ्याच्या सुटीत आकाश नजारे- चंद्रासोबत ग्रह ओळख अधिक सुलभ करायची असेल तर ४ मे च्या पहाटे वलयांकित शनी ग्रह चंद्राचे वर दिसेल, ५ तारखेला लालसर रंगाचा मंगळ ग्रह चंद्राचे अगदी जवळ आणि ६ ला सर्वात लहान असलेला बुध ग्रह चंद्रकोरी खाली पाहता येईल.- ५ मे रोजी पहाटे पूर्व क्षितिजावर कुंभ राशी समुहात दरताशी ६० अशा विविध रंगांच्या उल्का रात्री २ ते पहाटे ५.३० पर्यंत पडताना दिसतील.

गुरु व शूक्र ग्रहांचे अस्तआजवर पूर्व क्षितिजावर अधिराज्य गाजवणारा तेजस्वी शूक्राचा अस्त ६ मे ला पूर्वेस तर सर्वात मोठा असलेल्या गुरु ग्रहाचा अस्त ७ मे रोजी पश्चिमेस होईल. ग्रामीण भागातील लोक ‘चांदणी बुडी’ असेही म्हणतात. ३१ मे नंतर या ग्रहांचा पुन्हा उदय हाेईल.

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र दर्शनआपल्या पृथ्वीला सूमारे दीड तासात एक फेरी पूर्ण करणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन चार दिवस पहायला मिळेल. ९ मे राेजी रात्री ७.५७ ते ८.०३ या वेळी नैॠत्येकडून ईशान्य बाजूस जाताना खूप छान फिरत्या चांदणी रूपात दिसेल. १० ला रात्री ७.०८ते ७.१३ या वेळी दक्षिण पूर्व आकाशात, ११ मेच्या पहाटे ४.५७ ते ५.०३ या वेळी वायव्य ते आग्नेय दिशेला तर १३ राेजी पहाटे ४.५४ ते ५ वाजता वायव्य ते दक्षिणेकडे जाताना बघावे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमान