शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जि.प. शाळांचे होणार ‘ऑडिट’; ‘लोकमत’च्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 10:31 IST

जिल्हा परिषद शाळेच्या दूरवस्थेसंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळांचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्दे सीईओंचे अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद शाळेच्या दूरवस्थेसंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळांचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले. शाळांमध्ये भौतिक सुविधा परिपूर्ण नसल्याने आकस्मिक घटना घडू नये म्हणून शाळेच्या इमारती, वीजपुरवठा व इतर भौतिक सुविधाबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यात जि.प.च्या सुमारे १५३८ वर शाळा आहेत. शेकडो जि.प.च्या शाळांमध्ये विद्युत पुरवठा खंडित आहे. मोठ्या संख्येने वर्गखोल्या नादुरुस्त आहे. कुठे छत गळत आहे, तर कुठे भिंतीला भेगा पडल्या आहे. अनेक शाळेच्या वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून धोकादायक असतानाही वर्ग भरविण्यात येत आहे.काही शाळेच्या छतावरून उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत. शाळा परिसरात स्वच्छता ठेवण्यात येते काय? विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळते काय? शाळेला सुरक्षा भिंत आहे काय?, शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या खोलीची स्वच्छता होते काय? आहाराचा दर्जा, शुध्दता व चव आदीची तपासणी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सीईओंनी अधिकाऱ्यांना दिेले आहेत.

पथकाद्वारे होणार तपासणीसमग्र शिक्षाअंतर्गत कार्यरत कनिष्ठ अभियंता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या तीन अधिकाºयांच्या पथकाव्दारे जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळांचे विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑडिट करण्यात येणार आहे. हे आॅडिट शंभर टक्के शाळांना भेटीच्या माध्यमातून करण्याचे निर्देश सीईओंनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

टॅग्स :Schoolशाळा