शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ युवासेना, संघ स्वयंसेवकही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:22 IST

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीला विरोध केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याच स्वयंसेवकांकडून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे.

ठळक मुद्देराजकीय पक्षदेखील घेताहेत बाजू‘सोशल मीडिया’वर नागपूरकरांची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर उपराजधानीतील नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या समर्थनार्थ शहरात निदर्शने झाली. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यप्रणालीला विरोध केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याच स्वयंसेवकांकडून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. तर शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानादेखील नागपुरात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली झाल्याची बातमी एखाद्या वणव्यासारखी नागपूरकरांमध्ये पसरली आणि नागरिकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे आम आदमी पक्षासह युवासेनेचे पदाधिकारीही मुंढे यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत.

‘आप’चे कार्यकर्ते पावसातदेखील आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर युवासेनेतर्फे चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून जर मुंढे यांची बदली रद्द झाली नाही तर जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मुंढे यांची बदली झाल्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी संघाच्या स्वयंसेवकांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घाणेरड्या राजकारणातूनच मुंढे यांची बदली झाल्याची भावना अनेक संघ स्वयंसेवकांनी ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून बोलून दाखविली आहे.

मुंढे यांनी नागपुरात खरोखरच चांगले कार्य केले. ‘कोरोना’च्या काळात त्यांनी केलेले नियोजन हे दूरदृष्टी दाखविणारे होते. त्यांची अचानक झालेली बदली ही नागपूरसाठीदेखील नकारात्मक बाब आहे, असे मत संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केले.‘सोशल मीडिया’वर निघतेय ‘भडास’‘सोशल मीडिया’वर मुंढे यांच्या समर्थनार्थ मोहीमच सुरू झाली. ‘फेबुक’वर ‘व्ही सपोर्ट तुकाराम मुंढे’ यासारखे विविध ‘पेजेस’ तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून मुंढे यांच्या बदलीचा निषेध करण्यात येत आहे. काही नागरिकांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहीमदेखील राबविली आहे.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे