शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

बंदुकीच्या धाकावर तरुणाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:14 IST

रस्त्यावर वायर बांधून मोटरसायकलस्वाराला पाडले आणि त्याचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कन्हान नदीवरील साहोली पुलावर घडली.

ठळक मुद्देजखमी स्थितीत आढळला : बंदुकीसह, काडतूस, तलवार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा/ पारशिवनी : रस्त्यावर वायर बांधून मोटरसायकलस्वाराला पाडले आणि त्याचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कन्हान नदीवरील साहोली पुलावर घडली. त्यानंतर गुरुवारी तो तरुण जखमी स्थितीत साहोली शिवारात आढळला. या अपहरणाने पारशिवनी तालुक्यासह खापरखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.राजू नामदेव पेंदाने (३१, रा. भानेगाव) असे जखमीचे नाव आहे. तो रेती पुरवठादार असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास तो पारशिवनीकडून खापरखेडाकडे एमएच-४०/४७८५ क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान साहोली गावाजवळील कन्हान नदीच्या पुलावर दोन्ही बाजूने आरोपींनी अर्थिंग तार बांधलेली होती. राजू येताच त्यांनी तीे तार उचलली. त्यामुळे तो दुचाकीवरून खाली पडला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर झडप घालून त्याचे अपहरण केले. त्याच्या मोटरसायकलमागे त्याचा भाऊ भुजंग येत असताना त्याला राजूची मोटरसायकल पुलावर पडलेली दिसली. त्यामुळे त्याला संशय येताच त्याने पोलिसांना सूचना दिली. दोन दिवस तपास करूनही तो कुठेच आढळला नाही.दरम्यान गुरुवारी भुजंगच्या गाडीत एका व्यक्तीने चिठ्ठी लिहून टाकली होती. त्यात आरोपीचे नाव होते. याबाबत भुजंगने पोलिसांना माहिती देऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सक्तीने विचारपूस केली असता त्याने अपहरणाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलीस राजूच्या शोधात निघाले असताना त्यांना राजू गंभीर जखमी स्थितीत साहोली शिवारात आढळला. त्याच्या छातीत बंदुकीची गोळी लागलेली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेच त्याला कामठीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. या प्रकरणी पोलिसांनी साहोली येथील मंगेश बागडे याच्यासह आणखी दोघांना अटक केली. रेती व्यवसायातून हे अपहरण झाल्याची जोरदार चर्चा केली जात आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असून दोघे फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारशिवनी पोलीस आरोपींच्या मागावर आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.