शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील युवांना सैन्यात सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:18 IST

भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर मुख्यालयाचे भरती संचालक कर्नल आर.एम. नेगी यांनी पत्रकार परिषदेतून केले.

ठळक मुद्दे२३ आॅक्टोबरपासून सैन्याता भरतीला सुरुवात : कर्नल आर.एम. नेगी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांनीही जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी सेनेच्या नागपूर मुख्यालयाने २३ आॅक्टोबरपासून खास विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सेनेच्या नागपूर मुख्यालयाचे भरती संचालक कर्नल आर.एम. नेगी यांनी पत्रकार परिषदेतून केले.नागपूर मुख्यालयातर्फे दरवर्षी सेनेत भरती होऊन देशाची सेवा करण्याची संधी युवकांना दिली जाते. यावेळी सेनेने ही भरती प्रक्रिया अमरावती जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू क्रीडा स्टेडियम येथे आयोजित केली आहे. २३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. कर्नल नेगी म्हणाले की, भारतीय सेनेत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. विदर्भातील युवकांनीसुद्धा यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. बुलडाणा सोडून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील युवक यात सहभागी होऊ शकतात. सात कॅटेगरीसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. साडेसतरा वयोगटाच्या वरील युवकांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे. युवकांनी दलाल अथवा अन्य कुणाचे सहकार्य घेऊ नये. किमान १० टप्प्यात भरती प्रक्रिया होणार आहे. गेल्या वर्षी भरती प्रक्रियेत ४० ते ४५ हजार युवक सहभागी झाले होते. यावर्षीही त्यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नेगी यांनी व्यक्त केली. यावेळी डिफेन्स पीआरओ ग्रुप कॅप्टन बी.बी. पांडे उपस्थित होते. २४ आॅगस्टपासून आॅनलाईन नोंदणीसेना भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २४ आॅगस्टपासून युवकांना वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करायचे आहे. यात पदनिहाय शैक्षणिक गुणवत्ता, वयाची मर्यादा व आवश्यक कागदपत्राची माहिती मिळणार आहे. ७ आॅक्टोबरपर्यंत ही वेबसाईट सुरू राहणार आहे.नशेचे पदार्थ सेवन करू नयेदेशात झालेल्या काही भरती प्रक्रियेत युवकांनी शारीरिक चाचणीत क्षमता वाढविण्यासाठी युवक मादक पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेपूर्वी युवकांची चाचणी होणार आहे. यात युवक आढळल्यास त्याला भरती प्रक्रियेच्या बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी मादक पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहनही नेगी यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर