सदस्याला मिळणार ८ जीबीचा पेनड्राईव्ह : नोंदणी फक्त एकच दिवसनागपूर : युवकांची शक्ती विधायक आणि सकारात्मक गोष्टींकडे वळवता आली तर राष्ट्राची खूप मोठी प्रगती होऊ शकेल. त्यासाठी युवाशक्तीला चांगल्या प्रेरणेची गरज आहे. युवकांना संघटित करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’ महाविद्यालयीन स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध कार्यक्रम व उपक्रम राबवित असते. या ‘युवा नेक्स्ट’ची बहुप्रतिक्षेत असलेली सदस्य नोंदणी रविवार २३ नोव्हेंबर रोजी रामदासपेठ येथील लोकमत भवनातील युवा नेक्स्ट कार्यालयात, सकाळी ९ वाजतापासून सुरू होत आहे.चौफेर, चौकस, चोखंदळ, युवा विश्वाचा सजग कर्णधार युवा नेक्स्ट आता नव्या जोशात, नव्या उत्साहात, नव्या उमेदीच्या रूपात समोर आला आहे. युवा नेक्स्टची २०१४-१५ वर्षाची सदस्यता नोंदणी मोहीम फक्त एकच दिवस राहणार आहे. रविवारी होणाऱ्या प्रत्येक युवा नेक्स्टच्या सदस्याला आकर्षक ओळखपत्रासोबतच ‘करिअरचा रोडमॅप’ हे प्रेरणादायी बुक, प्रसिद्ध ‘बॉयझोन हेअर कट’चे कुपन आणि ८ जीबी पेन ड्राईव्ह मिळणार आहे. या शिवाय आकर्षक ‘लकी ड्रॉ’ आहेच. सदस्य नोंदणीचे शुल्क फक्त २०० रुपये आहे. (प्रतिनिधी)युवा नेक्स्टच्या सल्लागार मंडळांमध्ये दिग्गजांचा सहभागयुवा नेक्स्टच्या सदस्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी या वर्षी युवा नेक्स्टच्या सल्लागार मंडळामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांना सहभागी करून घेण्यात आले आहे. यात अॅड. उज्ज्वल निकम (सरकारी वकील), गगन नारंग (एअर रायफल शूटर), आनंद कुमार (शिक्षणतज्ज्ञ), अतुल कुळकर्णी (अभिनेता), अच्युत गोडबोले (आयटी तज्ज्ञ), विश्वास नांगरे पाटील (आयपीएस अधिकारी), स्वप्निल जोशी (अभिनेता), उमेश कामत (अभिनेता) प्रिया बापट (अभिनेत्री), निवेदिता साबू ( फॅशन डिझायनर), अपर्णा वेलणकर (फिचर एडिटर-आॅक्सिजन), समीर बेलवलकर (बॉलिवूड फोटोग्राफर) आदींचा सहभाग आहे. सदस्यांना या मंडळींना भेटता येणार आहे, सोबतच मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधीही मिळणार आहे. धम्माल मस्तीसह व्यक्तिमत्त्व घडविणारे उपक्रमयुवावस्था ही मानवी जीवनात सर्वात महत्त्वाची अवस्था आहे. याचवेळी उत्कृष्ट गुरु किंवा व्यासपीठ मिळणे अतिशय आवश्यक असते. व्यक्तिमत्त्वात बदल करून घेता येतो. ही बाब लक्षात ठेवूनच युवा नेक्स्ट वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करीत आले आहे. जसे, ‘वॉर आॅफ दी वर्डस्’ (वादविवाद स्पर्धा), ‘रॉक दे फट्टे’ (रॉक बॅण्ड कॉन्टेस्ट), ‘दिशा’ (करिअर गायडन्स), ‘सायन्स पंडित’ (सायन्स प्रोजेक्ट कॉन्टेस्ट) ‘मिस्टर अॅण्ड मिस युवा नेक्स्ट’, ‘जो जीता वही सिकंदर’ आदींमध्ये आपले कौशल्य दाखविता येते. धम्माल मस्ती यांच्यासह व्यक्तिमत्त्व घडविणारे यासारखे अनेक उपक्रम या वर्षीही आयोजित केले जाणार आहे.
युवा नेक्स्टची सदस्य नोंदणी आज
By admin | Updated: November 23, 2014 00:36 IST