लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर व-हाड्यांनी कॅटरर्सकडे काम करणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोनू ऊर्फ स्वप्निल रमेश डोंगरे (वय ३०) या तरुणाचा करुण अंत झाला.सोनू जरीपटक्यातील पॉवरग्रीडजवळच्या सहयोगनगरात राहायचा. अत्यंत गरीब कुटुंबातील सोनू कॅटरर्सकडे काम करायचा. ५ मे च्या रात्री लकडगंजमधील पाटीदार भवनात एक लग्नसमारंभ होता. त्यात सोनू कॅटरर्स सर्व्हिससाठी गेला होता. रात्री समारोपाची वेळ होत आली असताना सामानाची आवराआवर सुरू झाली. सोनूने उरलेले फळ एका पिशवीत ठेवले. या कारणावरून एका व-हाड्याने त्याला टोकले. त्यांच्यात बोलचाल सुरू असताना दुसरे काही व-हाडी तेथे आले. त्यांनी सोनू आणि अन्य काही जणांशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला चढवला. सोनूला आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला मेयोत दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास डॉक्टरांनी सोनूला मृत घोषित केले. याप्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून लकडगंज पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
नागपुरात व-हाड्यांनी घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:38 IST
लग्न समारंभात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर व-हाड्यांनी कॅटरर्सकडे काम करणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सोनू ऊर्फ स्वप्निल रमेश डोंगरे (वय ३०) या तरुणाचा करुण अंत झाला.
नागपुरात व-हाड्यांनी घेतला तरुणाचा बळी
ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून वाद : बेदम मारहाणीमुळे झाला मृत्यू