शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युथ एम्पॉवरमेंट समिट : दोन दिवसात १५ हजारावर मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:51 IST

फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी ७१० जणांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. अशाप्रकारे दोन दिवसात विविध कंपन्यांनी १५ हजारावर मुलाखती घेतल्या. यातून १४८६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसात ३३९ जणांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.शनिवारी तब्बल ९,५०० तरुण-तरुणी समिटमध्ये सहभागी झाले होत्या. यापैकी पाच हजारावर लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी ७१० जणांची विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. ४१ कंपन्यांचे ८० एच.आर. यांनी मुलाखती घेतल्या. दोन दिवसात १५ हजारावर मुलाखती पार पडल्या आहेत. कंपन्यांना ज्या उमेदवारांची तातडीची गरज आहे आणि ज्यांनी मुलाखत योग्यपणे यशस्वी केली आणि सर्व कागदपत्र सादर केले त्यांना लगेच नियुक्तीपत्र दिले जात आहे. तर ज्यांचे सिलेक्शन झाले पण काही कागदपत्र सादर झालेले नाही. तसेच कंपनीच्या नियमानुसार त्यांना थेट कंपनीत गेल्यावर जॉईंन करण्यात येणार आहे. जॉईंन करून घेण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला १० ते १५ दिवसांचा पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे.मुलाखतीसोबतच विविध मार्गदर्शनपर सत्रही पार पडले. पहिले मार्गदर्शनपर सत्र पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर होते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी पर्यावरण संवर्धन क्षेत्रात रोजगार आणि संबंधित क्षेत्रातील संधी याविषयी विस्तृत माहिती दिली. पॅरिस करारात भारत सहभागी झाल्यापासून, पर्यावरण संवर्धन ही भारत सरकारची प्रमुख मोहीम झाली असल्याने केंद्रीय अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. या क्षेत्रात स्वयंरोजगारासह केंद्र तथा राज्य पातळीवरील प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर कॉपोर्रेट कंपन्यांमध्ये नोकरीची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्राचा विस्तार मोठा असून, या संधींचा अभ्यास करून लाभ घेण्याचे आवाहन चॅटर्जी यांनी उपस्थित युवकांना केले.याशिवाय, खासगी कंपन्यांमध्ये नोकरी या विषयावर आशिष कोले यांनी तर विमा क्षेत्रातील संधींविषयी आयुर्विमा निगम अर्थात एलआयसीचे विकास अधिकारी अभिषेक शुक्ला यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि आमदार अनिल सोले यांच्यासह इतर पदाधिकारी विशेषत्वाने उपस्थित होते.थेट नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारही भारावलेयुथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये तरुणांचा मोठा उत्साह दिसून येतो. हजारो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. प्रत्येक दिवशी उमेदवारांना एसएमएस करून बोलावले जात आहे. दोन दिवसात १५ हजारावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अनेक उमेदवारांचे सिलेक्शन झाले. कालच ऑनलाईन अर्ज केला. आज मुलाखत झाली आणि लगेच नियुक्तीपत्रही मिळाल्याने उमेदवारही भारावले होते. सिलेक्शन झालेल्या काही उमेदवारांशी लोकमतने यावेळी संवादही साधला. यात कमल येंडे हा तरुण गोंदियाचा रहिवासी आहे. त्याने पॉलिटेक्निक डिप्लोमा केला आहे. पुण्यातील फोर्ज कंपनीत त्याचे सिलेक्शन झाले. त्याला लगेच नियुक्तीपत्र मिळाल्याने तो भारावला होता. कालच अर्ज केला. आज मुलाखत झाली आणि लगेच नियुक्तीपत्र मिळाल्याबद्दल त्याने आश्चर्यही व्यक्त केले. याचप्रकारे वर्धा येथील शिवानी श्याम चांभारे हिने बीई केले आहे. तिची पुण्यातील बीव्हीजी इंडिया लि. या कंपनीत निवड झाली. वर्धा येथीलच आफरीन नाझ अली हिचीसुद्धा बीव्हीजी इंडिया लि. कंपनीत निवड झाली. तिला वडील नाही. आई हाऊसवाईफ आहे. मोठी बहीण शिक्षिका आहे.एक नव्हे तीन-तीन कंपन्यांमध्ये सिलेक्शनया समिटमध्ये एका उमेदवाराला एक नव्हे तर पाच विविध कंपन्यांसाठी मुलाखती देण्याची संधी होती. यातील अनेकांचे एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले. नागपूरच्या अनघा महाकाळकर आणि प्रचिता उपाते या तरुणींची एक नव्हे तर तीन-तीन कंपन्यांमध्ये निवड झाली. दोन्ही तरुणींनी बी.ई. (टेलि कम्युनिकेशन) केले आहे. या दोघोंचीही बीव्हीजी, जेबील आणि वरॉक या पुण्यातील कंपन्यांमध्ये निवड झाली. इतकेच नव्हे तर त्यांना सिलेक्शन लेटरही प्रदान करण्यात आले.आज समारोपया युथ एम्पॉवरमेंट समिटचा उद्या रविवारी समारोप होणार आहे. शेवटच्या दिवशीही जवळपास १० हजार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीjobनोकरी