लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर (उमरेड) :‘पबजी’च्या आहारी गेलेल्या कावरापेठ येथील रितीक विवेक कोलारकर (१९) या तरुणाचा शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सुमारे महिनाभरापासून तो मृत्यूशी झुंज देत होता.रितीकला मोबाईलवर गेम खेळण्याचा छंद होता. मोबाईल हाताळत असतानाच त्याची प्रकृती बिघडल्याचे बोलले जात आहे. प्रकृती बिघडताच त्याला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्याच्यावर आठवडाभर उपचार चालले. मानसोपचारतज्ज्ञांनी सुद्धा त्याची तपासणी केली होती. त्यानंतर दोन्ही किडन्या निकामी झाल्याचीही बाब समोर येत आहे. रितीक ‘पबजी’ या जीवघेण्या गेमच्या आहारी गेल्याचेही समजते. यामुळेच त्याचा हकनाक बळी गेल्याचीही बाब पुढे आली आहे. रितीकचे आईवडील मोलमजुरी करतात. अत्यंत हलाखीची परिस्थिती कुटुंबीयांची आहे. रविवारी वेकोलिस्थित आमनदी स्मशानभूमीवर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रितीकच्या अशा निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थ्यांनी, तरुणांनी पबजीसारख्या जीवघेण्या खेळापासून सावध असले पाहिजे, असा सूर व्यक्त होत आहे.
‘पबजी’च्या आहारी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:57 IST
‘पबजी’च्या आहारी गेलेल्या कावरापेठ येथील रितीक विवेक कोलारकर (१९) या तरुणाचा शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सुमारे महिनाभरापासून तो मृत्यूशी झुंज देत होता.
‘पबजी’च्या आहारी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्देमोबाईलवर गेम खेळण्याचा होता छंद