नागपूर : तुझा भाऊ शिवीगाळ करतो, असे सांगणाऱ्या तरुणाला एका आरोपीने तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी तरुणाने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, हाताचे बोट तुटले. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता अमरनगरात ही घटना घडली. आरोपीचे नाव आकाश ऊर्फ तोत्या आहे. जखमीचे नाव नितीन नवलकिशोर यादव आहे. आरोपी तोत्या नेहमी शिवीगाळ करतो म्हणून, नितीन तोत्याचा भाऊ ललित याचसोबत बुधवारी सायंकाळी त्रिमूर्ती चौकात बोलत होता. तेवढ्यात तोत्या तेथे आला. आज तुझे नही छोडूंगा म्हणत तोत्याने नितीनच्या डोक्यावर तलवार मारण्याचा प्रयत्न केला. नितीनने उजवा हात वर करून तलवारीचा वार झेलला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. परंतु, हाताचे बोट कटले. या घटनेने परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले. (प्रतिनिधी)
तरुणावर तलवारीने हल्ला
By admin | Updated: May 21, 2016 02:53 IST