शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या पार्टीत तरुणाला मारहाण : तिघांना अटक, तलवारही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:11 IST

मैत्रिणीच्या पार्टीत सहभागी झालेल्या संदीप गेंदलाल यादव (वय ३२, रा. यादवनगर, गवळीपुरा, कामठी) या तरुणाला पार्टीतील तिघांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. कामठी मार्गावरील ड्युक्स बार आणि रेस्टॉरंटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

ठळक मुद्दे जरीपटक्यात घडला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मैत्रिणीच्या पार्टीत सहभागी झालेल्या संदीप गेंदलाल यादव (वय ३२, रा. यादवनगर, गवळीपुरा, कामठी) या तरुणाला पार्टीतील तिघांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. कामठी मार्गावरील ड्युक्स बार आणि रेस्टॉरंटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.संदीपच्या मैत्रिणीने कामठी मार्गावरील ड्युक्स बार आणि रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री एक पार्टी आयोजित केली होती. त्यात तो सहभागी झाला. तेथे असलेल्या सुखचैनसिंग सुखवेंदरसिंग सिन्हा (वय २७, रा. बाबादीपसिंग नगर) आणि रोहित कुलदीप शर्मा (वय ३२, रा. बाबादीपसिंग नगर) या दोघांसोबत संदीपचा वाद झाला. पाहता पाहता आरोपींनी संदीपवर लाकडी दांड्याने हल्ला चढवला. त्याच्या पायावर जबर फटके हाणून त्याला दुखापत केल्यामुळे संदीपचे मित्र मदतीला धावले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. संदीपने हा प्रकार अमित ऊर्फ चिन्नू कुलदीप शर्मा याला फोन करून सांगितला असता चिन्नूनेही संदीपला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पार्टीत एकच गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस तेथे पोहचले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. चिन्नू शर्माच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात पोलिसांना एक तलवार मिळाली. पोलिसांनी आरोपी सिन्हा आणि शर्मा बंधूला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक