शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे रेस्टॉरंट, फूड स्टॉल हायजेनिक आहे का? नागपुरात करणार मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 10:34 IST

नागरिकांना स्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ देणे ही रेस्टॉरंट चालकांची जबाबदारी आहे. मैत्री परिवार ही सामाजिक संस्था रेस्टॉरंट चालकांना ही जबाबदारी समाजावून सांगणार आहे. संस्थेतर्फे शहरात ‘हायजीन नं. १’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या माध्यमातून रेस्टॉरंट चालकांना स्वच्छतेचे नामांकनही दिले जाईल.

ठळक मुद्देमैत्री परिवार संस्था राबविणार संकल्पनाविष्णू मनोहर करणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ किंवा फूडस्टॉलवर जेवायला किंवा काही खायला जातो त्यावेळी आपल्या समोरचे सर्व छानच दिसते. मात्र हे पदार्थ जिथे तयार होतात, ते किचन व आसपासची अस्वच्छता व काम करणाऱ्यांची अवस्थाही वाईट असते. नागरिकांना स्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ देणे ही रेस्टॉरंट चालकांची जबाबदारी आहे.मैत्री परिवार ही सामाजिक संस्था रेस्टॉरंट चालकांना ही जबाबदारी समाजावून सांगणार आहे. संस्थेतर्फे शहरात ‘हायजीन नं. १’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या माध्यमातून रेस्टॉरंट चालकांना स्वच्छतेचे नामांकनही दिले जाईल, अशी माहिती संस्थेचे प्रा. संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.वैशाली गांधी यांनी अहमदनगरमध्ये राबविलेली ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. ही संकल्पना घेऊन मैत्री परिवारतर्फे शहरातील रेस्टॉरंट चालकांना हायजिनीक पद्धत अवलंबण्याचे मार्गदर्शन करणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे या अभियानाचे नेतृत्व करणार आहेत. याअंतर्गत संस्थेतर्फे पाच-पाच व्यक्तींचे पथक तयार करून सहा महिने शहरातील रेस्टॉरंट, खानावळी, स्ट्रीट फूड, फूड ट्रॅक आदी लोकांकडे भेटी देऊन त्यांना स्वच्छता पाळण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या पथकांमध्ये डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. विष्णू मनोहर यांनी सांगितले, या अभियानांतर्गत किचनचा परिसर, तेथील भिंती, फॅन, किचन ओटा, भांड्यांची स्वच्छता, ते ठेवण्याची जागा, भाजीपाल्याची योग्य व्यवस्था, धुण्याच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पेस्टकंट्रोल आदींसह काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, अ‍ॅप्रान, केस, नखे, चप्पल, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे कापड अशा सर्व गोष्टींबाबत चांगली व्यवस्था ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. या व्यावसायिकांना अभियानाचे सभासद बनवून वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. या भेटीदरम्यान संबंधित हॉटेल चालकांनी मार्गदर्शन केल्यानुसार बदल केला का, हे पाहण्यात येईल. ज्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या त्यांना प्रशस्तीपत्र देऊन ‘हायजीन नं. १’चे नामांकन दिले जाईल. व्यावसायिक हे प्रशस्तीपत्र दर्शनी भागात लावेल, जेणेकरून संबंधित रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता पाळल्या जात असल्याची खात्री येथे येणाºया नागरिकांना मिळेल व ते निर्धोकपणे जेवणाचा आनंद घेतील.रेस्टॉरंट व्यावसायिक स्वेच्छेने हे सभासदत्व स्वीकारू शकतात. मात्र यामुळे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणाऱ्यास हायजीनिक वातावरण निर्माण होईल असा विश्वास मनोहर यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला प्रमोद पेंडके उपस्थित होते.

टॅग्स :foodअन्न