शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य? ; रजिया पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 11:26 IST

बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात आठ दिवसात उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराच्या दोन घटना म्हणजे अमानवी राक्षसी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. ‘बेटी बचाओ’ आणि महिला सन्मानाचा नारा देणारे सरकार सत्तेत आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा जप करणारी पाठशाळा नागपुरात असतानाही अबोध बालिकेवर अमानुष अत्याचार होऊन त्याचे समर्थन करणारे मोर्चे काढले जातात. यावरून बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप रविवारी दीक्षाभूमी येथे झाला. ‘राष्ट्रनिर्मितीकरीता महिलांची भूमिका’ याविषयावर परिसंवादात प्रमुख वक्त्या म्हणून मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पुण्याच्या रजिया पटेल बोलत होत्या. डॉ. सरोज आगलावे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या बनारस विद्यापीठाच्या डॉ. इंदू चौधरी यांच्यासह ओबीसी महासंघाच्या शरयू तायवाडे, मंजुषा सावरकर, लेखिका अरुणा सबाने, बेनझीर खान, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जिचकार आदी उपस्थित होत्या.त्या म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रनेही कठुआमधील घटनेला भयावह संबोधून निषेध केला आहे. असे असताना काहींनी धर्मद्वेषातून बलात्काराचे समर्थन करणारे मोर्चे काढले, हे त्यापेक्षा भयानक आहे. यामध्ये दोन आमदारांचाही समावेश होता.या घटनात पितृसत्ताक समाजातील लिंगभेदाचे, धर्माचे आणि जातीभेदाचे धागे जुळले आहेत. ही कोणती संस्कृती आहे? वास्तविक ही स्थिती जुनी मनुवादी व्यवस्था आणण्याचे संकेत आहेत. अशा मानसिकतेच्या लोकांना संविधानामुळे महिलांना, दलितांना मिळालेला सन्मान मान्य नाही.यावेळी इंदू चौधरी यांनी संविधान जिवंत असेपर्यंत बाबासाहेब आमच्यामध्ये जिवंत असल्याची भावना व्यक्त केली. मनुवादी मानसिकतेचे लोक जातीव्यवस्था मानणाऱ्या दुसऱ्यांकडून अत्याचार करतात व स्वत: मात्र गप्प राहतात कारण त्यांना निवडणुका आल्या की तुमचे व्होट हवे असते. हे कोण लोक आहेत, ज्यांना संविधान उद्ध्वस्त करायचे आहे? यावेळी डॉ. सरोज आगलावे यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षशीला वाघदरे यांनी केले तर संचालन वीणा राऊत यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे एन.आर. सुटे, चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती