शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

‘आपली बस’ थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:32 IST

‘आपली बस’च्या कंडक्टरने (वाहक) बसमध्ये गैरवर्तन केल्याची पत्नीची तक्रार ऐकताच संतापलेल्या धंतोली ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयाने संबंधित बसवाहकाला जबर मारहाण केली.

ठळक मुद्देपत्नीशी गैरवर्तन; पोलीस पतीची वाहकाला मारहाण : संतापलेल्या वाहकांचा धंतोली ठाण्यात राडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आपली बस’च्या कंडक्टरने (वाहक) बसमध्ये गैरवर्तन केल्याची पत्नीची तक्रार ऐकताच संतापलेल्या धंतोली ठाण्याच्या पोलीस कर्मचाºयाने संबंधित बसवाहकाला जबर मारहाण केली. मात्र वाहकाने कुठलाही गैरप्रकार केला नाही, गर्दीमुळे चुकीने हा प्रकार झाला. कुठलीही चौकशी न करता मारहाण करण्यात आली, असा पवित्रा घेत संतापलेल्या बसवाहकांनी धंतोली पोलीस स्टेशनसमोर गोंधळ घातला. पोलिसांनी वाहकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे बसवाहकांमध्ये असंतोष पसरला असून शनिवारी दुपारपासून त्यांनी कामबंद करीत ‘आपली बस’ची चाके थांबविली आहेत.छेडखानीचा आरोप असलेल्या वाहकाचे नाव अशोक वालुरकर (४५) असून त्याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुटीबोरीकडून सीताबर्डीकडे येणाºया आपली बसमधून संबंधित महिला प्रवास करीत होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास बस धीरन कन्या शाळेसमोरील बुटीबोरी पॉर्इंटवर पोहचताच महिलेने धंतोली ठाण्यात कार्यरत असलेला महिलेने पतीला फोन केला व प्रवासादरम्यान बसवाहक अशोक वालुरकरने आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार केली. माहिती मिळताच पोलीस कर्मचाºयाने लागलीच बुटीबोरी पॉर्इंटवर जाऊन वाहक वालुरकर यांना मारहाण केली व पोलीस स्टेशनमध्ये आणले. हा प्रकार पाहून बसवाहकांमध्येअसंतोष पसरला. पोलीस कर्मचाºयाने चौकशी न करता गुन्हा दाखल करण्याआधीच वाहकाला मारहाण केल्याचा आरोप बस कर्मचाºयांनी केला. वाहकांच्या मते बुटीबोरी बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. अशावेळी तिकीट काढताना कंडक्टरचा प्रवाशांना धक्का लागणे शक्य असते. असे असताना महिलेने नाहक तक्रार केली असल्याचा आक्षेप वाहकांनी घेतला. त्यामुळे सीताबर्डीपासून धंतोली स्टेशनपर्यंत मारहाण करीत नेल्याने संतापलेल्या वाहकांनी काम बंद करून धंतोली ठाण्यावर मोर्चा वळविला. वाहक अशोक वालुरकर यांना सोडून संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी करीत बसवाहकांनी नारेबाजी केली. त्यामुळे धंतोली भागात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलीस कर्मचाºयावर कारवाईची मागणी करीत वाहक ठाण्यासमोरच धरण्यावर बसले. स्थिती लक्षात घेता परिमंडळाचे डीसीपी राकेश ओला धंतोली ठाण्यात पोहचले. त्यांनी वाहक प्रतिनिधी व कामगार नेते बंडू तळवेकर यांच्याशी चर्चा करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी वाहक अशोक वालुरकर यांच्यावर महिलेशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करीत अटक केली .

वाहक संपावरपोलिसाकडून मारहाण व त्यानंतर वाहकाविरोधात अटकेची कारवाई केल्याने बसवाहकांनी काम बंद केले. त्यामुळे दुपारपासून आपली बस थांबली होती. कर्मचारी संघटनेने सायंकाळी बैठक घेउन संपाचा इशारा दिला. अशोक वालुरकर यांचा जामीन घेऊन मारहाण करणाºया पोलीस कर्मचाºयावर कारवाईची मागणी करण्यात येईल. पोलिसावर कारवाई होईपर्यंत कामावर परतणार नाही, असा इशारा संघटनेच्या प्रतिनिधीने दिला.प्रवाशांचे हालशनिवारी दुपारपासून अचानक आपली बसची चाके थांबल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. बुटीबोरी, कामठी, डिफेंस, हिंगणा आदी भागात जाणाºया प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. बस बंद झाल्याचे समजताच काहींनी आॅटोचा पर्याय निवडला. मात्र बसवर अवलंबून असलेल्यांना हाल सहन करावे लागले. आॅटोचा पर्याय निवडणाºयांनाही वेळेवर आॅटो मिळत नसल्याने ताटकळावे लागले. त्यामुळे सीताबर्डी परिसरात प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून येत होते.