शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानलेल्या बहिणीवरच जडला जीव, केला विनयभंग; आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 11:45 IST

गिट्टीखदानमध्ये तरुणीशी मानलेल्या भावानेच छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

नागपूर : तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून मानलेल्या भावानेच तिचा पाठलाग करून छेड काढणे सुरू केले. तिचा विनयभंग केल्याची घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.   

पीडित २१ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. तिचे आई-वडील नागपुरात मजुरी करतात. आरोपी तरुणही तिच्याच गावचा असून तोदेखील कामाच्या शोधात नागपुरात आला. दोघांची ओळख झाली आणि आडनावही सारखेच असल्याने तिने त्याला घरी बोलावले व आई-वडीलांशी परिचय करून दिला. यानंतर, त्याचे तरुणीच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. भाऊ-बहिणीचे नाते असल्यामुळे त्याच्याकडे कोणीही संशयाच्या नजरेने बघितले नाही. हळू-हळू त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले, तिलाही तो आवडायला लागला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. परंतु, आडनाव एकच असल्यामुळे लोक काय म्हणतील, असा सवाल करत तरुणीने लग्नास नकार दिला.

मात्र, तो ऐकून घेण्यास तयार नव्हता. तो तिला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. दरम्यान, तरुणीच्या घरच्यांनी नागपुरातील युवकाशी तिचे लग्न ठरविले. त्यामुळे, हा आणखीन चिडला व त्याने तिला लग्न न करण्यासाठी दमदाटी करीत धमकीही दिली. मात्र, तरुणीने त्याच्या धमकीला न जुमानता नकार देत साक्षगंध उरकून घेतले. त्यामुळे त्याने तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मिळवत त्याला तरुणीचे फोटो पाठवत त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली व लग्न न करण्याचा सल्ला दिला. 

होणाऱ्या पतीने तरुणीला याबाबत विचारणा केली असता तिने थेट नकार दिला. व पुढे असा प्रकार घडू नये, यासाठी तिने होणाऱ्या पतीसह गिट्टीखदान पोलिसात मानलेल्या भावाविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ