माैदा : भरधाव वाहनचालकाने दुचाकीला मागून जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी फाटा येथे गुरुवारी (दि. १५) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुनील रामूजी शेंडे (३६, रा. गुमथळा, ता. कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील हा आपल्या एमएच-४०/एई-४७११ क्रमांकाच्या दुचाकीने कंपनीतून घरी येत हाेता. दरम्यान, सावळी फाटा परिसरात भंडाऱ्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच-३२/क्यू-५६४३ क्रमांकाच्या वाहनचालकाने त्याच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने सुुनीलचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनाेहर काशिनाथ शेंडे (४५, रा. गुमथळा, ता. कामठी) यांच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार रवींद्र बकाल करीत आहेत.