टाकळघाट : राहत्या घरी गळफास लावून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट येथे रविवारी (दि. ३) दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास घडली.
शुभम अरुण शेंडे (२३, रा. केसरी माेहल्ला, टाकळघाट) असे मृताचे नाव असून, त्याला दारूचे व्यसन हाेते. ताे दारू पिऊन आल्याने त्याच्या आईने व भावाने त्यास हटकले हाेते. दरम्यान, घरी कुणीच नसताना शुभमने घरातील लाकडी फाट्याला दुपट्ट्याने गळफास लावून ताे मृतावस्थेत आढळून आला. याबाबत पाेलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी रितिक ऊर्फ चिंटू अरुण शेंडे (२१) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार बन्साेड करीत आहेत.