शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची होळी ‘चायनीज’ मुक्त; ‘कोरोना’ची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:31 IST

‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे.

ठळक मुद्देग्राहकांना ‘मेड इन इंडिया’च पाहिजे बाजारातून ‘चायना मेड’ मालाची मागणी घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘चायनीज’ सामानावर बंदी घालण्यासाठी दरवर्षी अनेक संघटनांकडून आवाहन करण्यात येते, परंतु त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो. परंतु यंदा स्वस्त माल असूनदेखील ‘चायना मेड’ला मागणी कमी असल्याचे चित्र आहे.‘कोरोना’च्या दहशतीचा फटका होळीच्या सणालादेखील बसताना दिसून येत आहे. बाजारांमध्ये ९० टक्के माल ‘मेड इन इंडिया’च दिसून येत आहे. तर मागील वर्षी उरलेला १० टक्के ‘चायनिज’ माल विकण्यासाठी विक्रेत्यांची दमछाक होत आहे.‘लोकमत’ने इतवारीतील व्यापाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. नागपुरात यंदा ‘चायनीज’ सामानच नाही. सर्व माल दिल्लीहून मागविण्यात आला आहे. त्यामुळे होळी ‘चायनीज’ मुक्त होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.होळी, दिवाळीसह विविध सणांच्या वेळी ग्राहकांनी चीनमधील मालाचा बहिष्कार करावा हा आमचा प्रयत्न असतो व त्यासंदर्भात जनजागृतीदेखील करतो. परंतु या वर्षी त्यात ‘कोरोना’मुळे यश मिळाले आहे. यामुळे भारतीय मालाची मागणी वाढली असून ती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट आहे. यंदा जो व्यवसाय होईल त्याचा फायदा भारतीय उत्पादक व विक्रेत्यांना मिळेल, असे मत सामाजिक कार्यकर्ता गुड्डू टक्कामोरे यांनी व्यक्त केले.मागील ३ ते ४ वर्षांपासून दिल्लीत ‘चायनीज’ मालाप्रमाणेच माल तयार होत आहे. सुरुवातीला त्या मालात दर्जा व ‘फिनिशिंग’मध्ये फरक असायचा. परंतु आता त्यात खूप सुधारणा झाली आहे. दरदेखील कमी आहे. त्यामुळे यंदा पिचकारी, रंगाचा ९५ टक्के माल दिल्लीतून आला आहे. रंग व गुलालाचा बहुतांश माल हा उत्तरप्रदेशमधील हाथरस येथून येतो, अशी माहिती विक्रेते शशांक जैन यांनी दिली.

 

टॅग्स :Holiहोळी