शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तूर डाळ कंबरडे मोडणार : एक महिन्यातच हजार रुपये महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 20:39 IST

सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीच्या भावाने यंदा कंबरडे मोडणार आहे. एक महिन्यातच क्विंटलमागे हजार रुपयांची वाढ होऊन घाऊकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ६२ ते ६८ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ७० ते ७५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही हजार रुपयांनी वाढले आहेत. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देशासनाने लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीच्या भावाने यंदा कंबरडे मोडणार आहे. एक महिन्यातच क्विंटलमागे हजार रुपयांची वाढ होऊन घाऊकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ६२ ते ६८ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ७० ते ७५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही हजार रुपयांनी वाढले आहेत. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.तुरीचे पीक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. गेल्यावर्षी भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कापूस पिकावर लक्ष केंद्रित केले. याशिवाय कमी पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे. या सर्व बाबी हेरून व्यापाऱ्यांनी आतापासून तूर डाळीचे भाव वाढविण्यास सुरू केली केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूर डाळ पुन्हा १०० रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.तुरीचे उत्पादन घटण्याचा अंदाजधान्य व्यापाऱ्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव प्रति किलो १८० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढलेल्या भावामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्यात यावेत, यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न सुरू केले होते. शिवाय आयातही सुरू केली होती. मात्र तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांतच तूरडाळीचे भाव वेगाने घाऊकमध्ये दर्जानुसार ५० रुपयांपर्यंत कमी झाले होते. भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. या सर्व घडामोडीचा फटका व्यापाऱ्यांना बसला आणि अनेक दाल मिल बंद पडल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तूरडाळीचा साठा केलाच नाही. पण यावर्षी पीक कमी येण्याच्या अंदाजामुळे व्यापाऱ्यांनी सावधतेने पावले उचललेली आहेत.केंद्राने वाढविली आधारभूत किंमतगेल्यावर्षी तुरीला भाव कमी मिळाल्यामुळे केंद्र सरकारने आधारभूत किंमत ५९०० रुपयांपर्यंत वाढविली आहे. एवढ्या किमतीत तूर खरेदी करणारा व्यापारी वाढीव भावातच डाळ विकणार आहे. शिवाय पीक कमी येण्याचा अंदाज खरा ठरल्यास भाव झपाट्याने वाढतील आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.सर्वच कडधान्य महागलेतूरडाळीप्रमाणेच मागील महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. हरभरा डाळीच्या किमतीत घाऊकमध्ये प्रति किलो १२ रुपयांची वाढ होऊन भाव ६० ते ६२ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच उडीद मोगर प्रति किलो ८ रुपये, मूग मोगर ८ रुपये, मसूर डाळ ३ रुपये, मूग डाळ ३ रुपये, देशी हरभरा ४ रुपये, ज्वारी ५ रुपये, काबुली चण्याचे भाव ५ रुपयांनी वाढले असून भाववाढीची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Inflationमहागाईfoodअन्न