शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात ३,५६५ नागपूरकरांचे श्वानांनी घेतले चावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानी नागपुरात जेवढी दहशत गुन्हेगारांची नसेल, तेवढी भटक्या श्वानांची आहे. शहरातील एकही चौक आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानी नागपुरात जेवढी दहशत गुन्हेगारांची नसेल, तेवढी भटक्या श्वानांची आहे. शहरातील एकही चौक आणि रस्ता त्यांच्या दहशतीतून सुटलेला नाही. मागील दीड वर्षात श्वानांनी चावे घेतल्यामुळे तीन हजार ५६५ नागरिक जखमी झाले. दुचाकीच्या मागे धावल्याने झालेल्या जीवघेण्या अपघातांची तर नोंदच नाही. मागील वर्षभरापासून श्वानांची निर्बीजीकरण मोहीम ठप्प आहे. त्यामुळे उपराजधानीतील श्वान बिनधास्त आहेत.

शहरात भटक्या श्वानांचा शहराएवढाच लगतच्या वसाहतींमध्येही उपद्रव वाढत आहे. महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या माहितीनुसार नागपूर आणि लगतच्या वसाहतींमध्ये मिळून जवळपास ८० हजार बेवारस श्वान आहेत. अलीकडे गणना न झाल्याने त्यांचा नेमका आकडा मनपाकडे नाही.

...

परिस्थिती हाताबाहेर

महापालिकेचे भटक्या श्वानांच्या संख्येवर आजतरी नियंत्रण नाही. २००६ पासून निर्बीजिकरणाची मोहीम सातत्याने राबवूनही संख्या कमी झालेली नाही. उलट वाढतच आहे. सर्वच श्वानांवर इलाज करणे महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे यंत्रणाही हतबल आहे. नसबंदीनंतरही श्वानांची संख्या वाढतच आहे, ही खरी डोकेदुखी आहे.

...

दृष्टिक्षेप

३० हजार - २००६ मध्ये नसबंदी सुरू झाली तेव्हाची संख्या

३ हजार ५६५ - मागील दीड वर्षातील श्वानदंश (२०२० मध्ये १,३६९, जून २०२१ पर्यंत - २,१९६)

९,५०४ - दीड वर्षात नागरिकांनी घेतलेल्या अँटी रेबीज लस

८० हजार - आता भटक्या कुत्र्यांची संख्या (अंदाजे संख्या, नेमका आकडा महानगरपालिकेकडे नाही)

...

श्वानदंशाच्या घटना

वर्ष २०२०

रुग्णालय: एप्रिल : सप्टेंबर : ऑक्टोबर : नोव्हेंबर : डिसेंबर : एकूण

इंदीरा गांधी रुग्णालय : ६७ : -: - : - : - : ६७

पाचपावली सूतिका गृह : ३१ : ३ : २० : २५ : ३१ : ११०

सदर रोग निवारा केंद्र : ७७ : -: - : - : १४० : २१७

महाल रोग निदान केंद्र : १२२ : ८८ : २३४ : ४८ : ४२० : ९१२

चकोले दवाखाना : ९: -: -: -: -: ९

आयसोलेशन दवाखाना : ४८ : -: -: - : - : ४८

नंदनवन यूपीएचसी : ६: -: -: -: - : ६

एकूण : ३६० : ९१ : २५४ : ७३ : ५९० : १,३६९

वर्ष २०२१

रुग्णालय: जानेवारी: फेब्रुवारी: मार्च: एप्रिल : मे : जून : एकूण

पाचपावली सूतिका गृह : ३१ : ४४ : ८ : -: - : ३४ : ११७

सदर रोग निवारा केंद्र : १९९ : ७६ : १६१ : ११२ : ११७ : १५४ : ७३९

महाल रोग निदान केंद्र : ३७९ : - : ३१७ : १०३ : १८७ : २७४ : १,२६०

एकूण : ६०९ : १२० : ४८६ : २१५ : ३०४ : ४६७ : २,१९६

...