शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

यवतमाळ पंचायत समितीतील गैरप्रकारास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

By admin | Updated: December 25, 2014 00:23 IST

पंचायत समिती यवतमाळअंतर्गत मुद्रांक शुल्क निधीतून विकासकामे करताना झालेल्या गैरप्रकारास जबाबदार असल्याणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नागपूर : पंचायत समिती यवतमाळअंतर्गत मुद्रांक शुल्क निधीतून विकासकामे करताना झालेल्या गैरप्रकारास जबाबदार असल्याणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सात ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. पाच कोटीचा आसपास हा घोटाळा झालेला असून त्याची विस्तृत चौकशी शासन करीत आहे. या चौकशीचे निष्कर्ष प्राप्त झाल्यावर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. यासंदर्भात सदस्य मदन येरावार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुंडे यांनी सांगितले की, यवतमाळ पंचायत समितीचे तत्कालीन विस्तार अधिकारी पी.जी. पारवे, आर.जी. कोराम व यु.म. माने या सर्वांना कार्यवाहीसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. विस्तार अधिकारी यांच्यामार्फत पुनश्च ग्रामपंचायतीचे मुद्रांक शुल्क अनुदानाबाबतच्या अभिलेख्याची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. संबंधित दस्तऐवजाची तपासणी झाल्यानंतर अपहारित रक्कम निश्चित करण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षणासाठी समिती स्थापन करणार ज्या ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण झाले नाही, ते का झाले नाही? याचा तपास करून त्यांच्या लेखा परीक्षणासाठी एक समिती स्थापन करून चौकशी केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. ग्रामविकास मंत्री म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १०३९ ग्रामपंचायती असून सन २००९-१० अखेर १००९ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण पूर्ण झालेले आहे. २०१०-११ मध्ये ९८५, २०११-१२ मध्ये ९५७ तसेच २०१२-१३ मध्ये २८ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण पूर्ण झाले आहे. २००९-१० पूर्वीच्या लेखा परीक्षणास दफ्तर उपलब्ध न झालेल्या ग्रामपंचायतची ४९ आहेत. त्यापैकी ९ ग्रामपंचायतींचे दफ्तर हे तत्कालीन ग्रामसेवक सेवानिवृत्त झाल्यामुळे उपलब्ध झालेले नाही. सदर दफ्तर उपलब्ध करण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्यामार्फत कार्यवाही सुरु आहे. उर्वरित ग्रामपंचायतींचे दफ्तर लेखा परीक्षणासाठी उपलब्ध नसल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. स्थानिक विधी लेखा विभागाच्या समन्वयाने लेखा परीक्षण करण्यात येईल. तसेच लेखा परीक्षणास दफ्तर का उपलब्ध झाले नाही, याची चौकशी महिनाभरात केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात सदस्य सर्वश्री डॉ. सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर यांनी प्रश्न विचारला होता. मोठ्या ग्रामपंचायतींसाठी नगररचना आराखड्याच्या धर्तीवर ग्रामविकास आराखडा मोठ्या ग्रामपंचायतींसाठी नगररचना आराखड्याच्या धर्तीवर ग्रामविकास आराखडा तयार करून जमीन वापराचे व बांधकामाचे निकष, जमीन विकासाचे निकष, जमिनीचे झोनिंग व विकास नियंत्रक नियमावली अधिनियम नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने करणे आवश्यक आहे. यासाठी १६ सप्टेंबर २०१० रोजी शासनाने निर्णय घेऊन त्याची कार्यवाही सुरू केली आहे. विकास आराखड्यासाठी ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून कमाल दहा लाखापर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येतो, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. मुंडे यांनी सांगितले की, पाच हजाराच्यावर लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना हे विकास आराखडे तयार करावयाचे आहेत. राज्यात २७ हजार ९०० ग्रामपंचायती आहेत. आजमितीस १४ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे पूर्ण झाले असून १७५ ग्रामपंचायतीचे आराखडे पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. संतुलित, समृद्ध, आदर्श गावे निर्माण करण्यासाठी हे विकास आराखडे बनविले जात आहेत. युद्ध पातळीवर विशेष निधीची तरतूद करून हे विकास आराखडे पूर्ण करू, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)