शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीनंतर यवतमाळच्या वाघाला मारण्याची परवानगी; राज्यमंत्री येरावार यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:23 IST

यवतमाळ जिल्ह्यातील वाघ नरभक्षक असल्याबाबतची खात्री झाल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा ,पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत गुरुवारी लक्षवेधीच्या उत्तरात केली.

ठळक मुद्देवाघ नरभक्षक असल्याची खात्री झाल्यानंतरचा निर्णय

आॅनलाईन लोकमतनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ५ शेतकरी व १६ गुरांचा मृत्यू झाला आहे. तपासणीनंतर वाघ नरभक्षक असल्याबाबतची खात्री झाल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जा ,पर्यटन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधान परिषदेत गुरुवारी लक्षवेधीच्या उत्तरात केली.काँग्रेसचे आमदार हरिसिंग राठोड यांनी लक्षवेधीतून हा मुद्दा उपस्थित केला होता. वाघाच्या हल्ल्यात पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील १० ते १२ लोकांचे बळी गेले आहेत. अनेक जनावरे मारली. वाघाला पकडण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे राठोड यांनी निदर्शनास आणले. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.जुलै ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत पांढरकवडा व राळेगाव तालुक्यातील पाच लोकांचे मृत्यू झाले आहेत. १६ जनावरे मारली. वाघाला पकडण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी आठ लाखांची मदत दिली जाणार असल्याचे येरावार यांनी सांगितले. सदस्य सुनील तटकरे, प्रवीण दरेकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Tigerवाघ