शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

यशवंतराव धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद जपणारे नेते- सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 02:23 IST

मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची राजकीय पायाभरणी केली, सहकार वाढविला व ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध केला. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री व अर्थमंत्री पदेही यशस्वीपणे सांभाळली.

नागपूर : मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची राजकीय पायाभरणी केली, सहकार वाढविला व ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध केला. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री व अर्थमंत्री पदेही यशस्वीपणे सांभाळली. ज्यांचा साहित्य, कला, संस्कृतीशी सबंध येईल, अशी माणसे राजकारणात शोधून सापडणार नाहीत. परंतु यशवंतरावांनी राजकारणासोबत महाराष्ट्राचाही साहित्यिक, सांस्कृतिक वारसा समृद्ध केला. त्यांनी धर्मनिरपेक्ष सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दिशेने कायम वाटचाल केली, असे मनोगत ‘लोकमत’चे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने आयोजित यशवंत महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गिरीश गांधी, आमदार हेमंत टकले, प्रा. गणेश चव्हाण, प्रदीप विटाळकर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.द्वादशीवार यांनी यशवंतरावांच्या जीवनचरित्राचे पैलू उलगडले. ते गरिबीत जन्माला आले आणि गरिबीतच मरण पावले. निधन झाले तेव्हा त्यांच्या पासबुकमध्ये ३६ हजार रुपये होते.ब्राह्मणेत्तर चळवळीत जन्मले तरी विरोधकांविषयी द्वेषभावनेऐवजी प्रत्येकाच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्याची विवेकबुद्धी त्यांच्यात होती. यशवंतरावांनी संधी मिळाली तेव्हा विविध भाषांसह राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लष्करशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.कवी संमेलनाने सुरुवात : उद््घाटन कार्यक्रमानंतर कवी संमेलनाच्या आयोजनाने या साहित्यिक व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. आमदार हेमंत टकले यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कवी संमेलनात प्रा. ज्ञानेश वाकुडकर, लोकनाथ यशवंत, डॉ. सागर खादीवाला, सना पंडित, बन्सी कोठेवार, मनीषा अतुल, डॉ. स्मिता देशपांडे या कवींनी त्यांच्या रचना सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविली.

टॅग्स :nagpurनागपूर