शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:01 IST

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, विदर्भातील डॉ. पराग घोंगे, डॉ. सतीश पावडे, प्रभा गणोरकर, दा.गो. काळे व सुमन नवलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देघोंगे, पावडे, गणोरकर, काळे, नवलकर यांना जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, विदर्भातील डॉ. पराग घोंगे, डॉ. सतीश पावडे, प्रभा गणोरकर, दा.गो. काळे व सुमन नवलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय गटात समीक्षा, वाङ्मयीन संशोधन, सौंदर्यशास्त्र, ललितकला आस्वादपर लेखनासाठी डॉ. पराग घोंगे यांच्या ‘अभिनय चिंतन : भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त’ या ग्रंथासाठी एक लाख रुपये रोख रकमेचा ‘श्री.के. क्षीरसागर पुरस्कार’, प्रथम प्रकाशन गटात ‘आफळ’ या समीक्षा सौंदर्यशास्त्रासाठी दा.गो. काळे यांना ५० हजार रुपये रोख रकमेचा ‘रा.भा. पाटणकर पुरस्कार’, प्रौढ वाङ्मय गटात डॉ. सतीश पावडे यांना ‘दी थिएटर ऑफ दी अ‍ॅब्सर्ड’ या तत्त्वज्ञान व मानसशास्त्रीय ग्रंथासाठी एक लाख रुपये रोख असलेला ‘ना.गो. नांदापूरकर पुरस्कार’, प्रभा गणोरकर यांना ‘आशा बगे यांच्या निवडक कथा’ या संपादित ग्रंथासाठी एक लाख रुपये रोख असलेला ‘रा.ना.चव्हाण पुरस्कार’ आणि डॉ. सुमन नवलकर यांना ‘काटेरी मुकुट’ या बालकादंबरीकरिता ५० हजार रुपये रोख असलेला ‘साने गुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील एकूण ३५ साहित्यिकांच्या प्रकाशित ग्रंथांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणliteratureसाहित्य