शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत स्टेडियमला जागतिक रूप मिळावे : विजय दर्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 10:52 IST

नागपुरात आयोजित अरिजित सिंग लाईव्ह कन्सर्टच्या रोमांचकारी सोहळ््यात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अरिजितच्या जादुई आवाजाचे भरभरून कौतुक केले.

ठळक मुद्देगडकरींची पूर्णवेळ उपस्थितीअखेर संधी मिळालीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपुरात आयोजित अरिजित सिंग लाईव्ह कन्सर्टच्या रोमांचकारी सोहळ््यात लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अरिजितच्या जादुई आवाजाचे भरभरून कौतुक केले. अरिजित सिंगचा नागपुरातील कार्यक्रम याअगोदर दोनदा हुकला होता. त्यामुळे या कार्यक्रमांनी नागपूरकरांची इच्छापूर्तीच झाली असून खऱ्या अर्थाने सुरेल स्वप्न साकार झाले असे म्हणता येईल, असे ते म्हणाले. जयंती नगरीच्या प्रकल्पामुळे तीन हजारांहून नागरिकांना हक्काचे व सोयींनी युक्त घर मिळणार आहे. येथे ‘हेलिपॅड’ असावे व नागरिकांच्या सोयीसाठी इस्पितळ असावे असा सल्ला मी मजुमदार यांना दिला असल्याचे दर्डा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यशवंत स्टेडियममध्ये १० हजार गाड्या एकाच वेळी ‘पार्क’ करता येतील, अशी सुविधा निर्माण करण्याचे गडकरी यांना आवाहन केले. शहरात ‘पार्किंग’ची समस्या वाढत आहे. त्यामुळे यशवंत स्टेडियमला पाडून तेथे १० हजार गाड्यांचे एका वेळी ‘पार्किंग’ करण्यासोबत जागतिक पातळीचे मैदान विकसित करायला हवे. नितीन गडकरी हे विकासपुरुष आहेत व त्यांनी मनात आणले तर हे नक्कीच शक्य होईल, असे विजय दर्डा यांनी यावेळी प्रतिपादन केले.

गडकरींची पूर्णवेळ उपस्थितीनितीन गडकरी यांना गाणे ऐकण्याची आवड आहे व अरिजित सिंगच्या स्वरांना ऐकण्यासाठी ते तसेच विजय दर्डा हे पूर्णवेळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गडकरी यांनी अरिजित सिंगचे कौतुक केले. जयंती नगरीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना घरे मिळाली आहेत. नवीन नागपूरचा हा भाग विकसित होत असून उड्डाणपुलामुळे वर्धा मार्गावर अवघ्या ५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या उपनगराप्रमाणे नागपूरचे उपनगरदेखील विकसित करू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

अखेर संधी मिळालीचकार्यक्रमाच्या सुरुवातीला अरिजित सिंगने रसिकांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. नागपुरात याअगोदर येता येता संधी हुकली होती. अखेर या शहरात सादरीकरण करण्याचे सौभाग्य मिळाले ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे, असे तो म्हणाला. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार वारे वाहायला लागल्याने समयसूचकता दाखवत त्याने स्टेजजवळील रसिकांना दूर होण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Arijit singhअरिजीत सिंहVijay Dardaविजय दर्डा