शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

यश बोरकर खून प्रकरण : संतोष काळवेच्या फाशीवर बुधवारी हायकोर्टात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:03 IST

११ वर्षीय निरागस बालक साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (२६) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बुधवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे.

ठळक मुद्देसहा वर्षांपूर्वी अपहरण करून केली होती हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११ वर्षीय निरागस बालक साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (२६) याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बुधवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली आहे.आरोपी मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. तो खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. परंतु, त्याने वस्तीतील लोकांना तो पोलीस असल्याचे सांगितले होते. पीडित बोरकर कुटुंबही खापरीतच राहते. आरोपीची बोरकर कुटुंबाशी व यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. १० जून २०१३ रोजी यश घराजवळच्या परिसरात मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, आरोपी मोटरसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्डड्रिंकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. आरोपी ओळखीचा असल्यामुळे यश बेफिकिर होऊन त्याच्या मोटरसायकलवर बसला. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा काँक्रिटच्या दगडाने ठेचून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले आहे तसेच, आरोपीने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखूनCapital Punishmentमृत्यूदंड