शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

अमेरिकन अधिकाऱ्यांचे संघस्थानी नमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 20:45 IST

२०१४ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचे महत्त्व वाढले असून अनेक मान्यवरांची पावले इकडे वळल्याचे दिसून आले. अगदी विदेशातील राजदूतदेखील संघाबाबत जाणून घेताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्दे‘कॉन्सुल जनरल’ डेव्हिड रॅन्झ यांनी दिली भेट : विदेशी राजदूत जाणून घेत आहेत संघकार्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : २०१४ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचे महत्त्व वाढले असून अनेक मान्यवरांची पावले इकडे वळल्याचे दिसून आले. अगदी विदेशातील राजदूतदेखील संघाबाबत जाणून घेताना दिसून येत आहेत. गुरुवारी तर चक्क अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली व संघस्थानी नमनदेखील केले. विशेष म्हणजे स्मृतिमंदिरात येण्याअगोदर त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या महाल येथील निवासस्थानीदेखील भेट दिली.सकाळी १० च्या सुमारास मुंबईतील अमेरिकन दूतावासातील ‘कॉन्सुल जनरल’ डेव्हिड रॅन्झ रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया व कार्यवाह अरविंद कुकडे यांनी त्यांचे स्वागत केले. रॅन्झ यांनी डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी संघाची कार्यपद्धती, सेवाकार्य, विविध प्रकल्प इत्यादींची माहिती जाणून घेतली. सुमारे दोन तास ते रेशीमबागेत होते व १२.१५ वाजता तेथून रवाना झाले. त्यांच्या समवेत ‘व्हाईस कॉन्सुल’ रॉबर्ट पॉल्सन हेदेखील होते. डेव्हिड रॅन्झ यांनी संघाच्या विविध प्रकल्पांबाबत आस्थेने जाणून तर घेतलेच. शिवाय संघाकडून स्वयंसेवक कशा पद्धतीने घडविण्यात येतात याचीदेखील विचारणा केली, असे राजेश लोया यांनी सांगितले. डेव्हिड रॅन्झ हे पहिल्यांदाच नागपुरात आले होते हे विशेष.विदेशातील राजदूतांनी अगोदरदेखील दिली भेटमागील वर्षी जुलै महिन्यात भारतातील जर्मन राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती व सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती. तसेच सिंगापूरचे ‘कॉन्सुल जनरल’ केव्हिन च्ये यांनीदेखील स्मृतिमंदिराला भेट दिली होती. २०१५ साली युरोपियन युनियनचे शिष्टमंडळ संघस्थानी आले होते.

टॅग्स :AmericaअमेरिकाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ