शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रीतून साधतात त्या मानवतेची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 02:30 IST

त्रिमूर्ती नगरातील आदर्श कॉलनीमध्ये राहणाऱ्या पूजा धकाते मागील १३ वर्षांपासून त्रिमूर्ती नगरातील सचिन मेडिकलमध्ये औषध विक्रीसाठी सहायक म्हणून काम करतात. घरात दोन मुले आणि पती व सासू-सासरे असा प्रपंच सांभाळून त्या या कोरोनाच्या काळातही मानवतेची ‘पूजा’ करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्रिमूर्ती नगरातील आदर्श कॉलनीमध्ये राहणाऱ्या पूजा धकाते मागील १३ वर्षांपासून त्रिमूर्ती नगरातील सचिन मेडिकलमध्ये औषध विक्रीसाठी सहायक म्हणून काम करतात. घरात दोन मुले आणि पती व सासू-सासरे असा प्रपंच सांभाळून त्या या कोरोनाच्या काळातही मानवतेची ‘पूजा’ करीत आहेत.या कोरोनाच्या दिवसात सारेच घरात थांबून असलेले. सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमधील उपस्थितीही सरकारने कमी केलेली आहे. आरोग्यसेवा मात्र अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने पूजा धकाते यांना घरी थांबणे अशक्यच. घरात एक आठ वर्षांचा व त्याहून एक मोठा अशी दोन मुले असतानाही ही ‘वॉरिअर मदर’ मुलांना सुरक्षितपणे घरात ठेवून आज कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये मैदानात उतरली आहे. मेडिकलमध्ये येणारे ग्राहक आधीच दु:खीकष्टी असतात. कुणाचे नातेवाईक अंथरुणाला खिळलेले तर कुणाची शस्त्रक्रिया अडलेली. एवढेच नाही, कुणी स्वत:च रुग्ण असतात. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी एका योद्ध्याच्या रूपात उभी ठाकलेली ही माउली केवळ सॅनिटायझर आणि मास्क या शस्त्रांनिशी लढताना पाहून कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही.‘लोकमत’शी बोलताना पूजा धकाते म्हणाल्या, पूर्ण सुरक्षा बाळगून असल्याने कोरोनाची भीती वाटत नाही. आपल्या मुलांना आणि पतीलाही याबद्दल भीती नाही. स्वयंसुरक्षा आणि स्वच्छता हेच यावर शस्त्र आहे, हे त्यांना पटले आहे. सकाळी ८ वाजता त्या मेडिकल शॉपला येतात. सायंकाळी ४ वाजेपर्यंत काम करून नंतर घरी परततात. गेल्यावर स्वत:ला पूर्ण सॅनिटाईज करून आणि पर्स, बॅग हे साहित्य बाहेर ठेवूनच त्या कामाला लागतात. मेडिकल शॉपमध्ये असले तरी मुलांची थोडी चिंता वाटते. मात्र मुले शहाण्यासारखी वागतात. ती कामात मदत करतात, पतींचेही आणि सासू-सासऱ्यांचेही सहकार्य मिळते. घरातून मिळालेला हा आधार आणि मानसिक पाठबळ दुसºया दिवशी कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ देऊन जातो. त्यांचे पती कापडाच्या शोरूममध्ये काम करतात. लॉकडाऊनमुळे ते बंदच असल्याने कुटुंबाची जबाबदारी आपण सांभाळतोय, याचाही त्यांना आनंद आहे. कुटुंबालाही पूजाचा अभिमान आहे.त्या म्हणतात, या कामात समाधान आहे. आजाºयांची सेवा करण्यासारखे दुसरे मोठे समाधान नाही. या कामातून ते मी मिळविते. अन्य महिलाही घरातल्या घरात राहून वृद्ध, महिला यांना मदत करूनही सेवा करू शकतात. यातून कोरोनावर आम्ही सारेच मात करू शकतो.

टॅग्स :Womenमहिलाmedicinesऔषधं