शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा नागपुरात सुरेल समारोप; मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 11:09 IST

१६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसात संत्र् याच्या गोडव्याने व नारंगी रंगाने न्हाऊन निघालेल्या नागपुरातील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी शानदार कार्यक्रमात समारोप झाला.

ठळक मुद्देसंत्र्याचे ‘ब्रॅन्डिंग’ जगभरात होणार‘मोबाईल फ्लॅश’ने चकाकले सभागृह

आॅनलाईन लोकमतनागपूर :१६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसात संत्र् याच्या गोडव्याने व नारंगी रंगाने न्हाऊन निघालेल्या नागपुरातील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ‘लोकमत मीडिया प्रा.लि’चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या उपस्थितीत शानदार कार्यक्रमात समारोप झाला.यावेळी आ.डॉ.मिलिंद माने, आ.यशोमती ठाकूर, आ.बळीराम शिरसकार, आ.समीर कुणावार, आ.अनिल सोले, आ.सुधाकर कोहळे, आ.आशिष देशमुख, आ.श्रीकांत देशपांडे, आ.मेधा कुळकर्णी, आ.जगदीश मुळीक, आ.बाळा बेगडे, आ.बाबूराव पाचर्णे, आ.संजय सावकारे, आ.भीमराव तापकीर, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.रमेश बुंदिले, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, पोलीस उपायुक्त राकेश ओला, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढच्या वर्षी यापेक्षा वेगळ्या अन् भव्य वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची अपेक्षा बाळगून प्रेक्षकांनी या महोत्सवाचा निरोप घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे रंजक निवेदन अनुजा घाडगे हिने तर समारोपीय सत्राचे संचालन श्वेता शेलगांवकर यांनी केले.

संत्र्याचे ‘ब्रॅन्डिंग’ जगभरात होणारयावेळी विजय दर्डा यांनी आपल्या भावना मांडल्या. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपुरात एक नवी सुरुवात झाली आहे. यामुळे संत्र्याला जागतिक ओळख मिळणार आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून संत्र्याचे जगभरात ‘ब्रॅन्डिंग’ होण्यास मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हाऊसफुल्ल गर्दी‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या समारोपप्रसंगी विभागीय क्रीडा संकुल ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कलाकारांच्या सादरीकरणाला नागपूरकरांनी भरभरून साद दिली. संपूर्ण परिसरात प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळी मैदानात हजारो लोक एकत्र झाले होते.‘मोबाईल फ्लॅश’ने चकाकले सभागृहसमारोपप्रसंगी कलाकारांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागपूरकरांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. सर्वांच्या हाती स्मार्ट फोन असल्याने प्रत्येक जण या कलावंतांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात होता. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर कॅमेऱ्यांचे फ्लॅश चकाकायला लागले. इतक्या गर्दीतही स्टेजवरील कलावंतासोबत दुरून का होईना आपण कसे दिसू यासाठी तरुणाईचे सेल्फी काढणे सुरू होते. सभागृहात बराच वेळ तरुणाईचे फ्लॅश चकाकत राहिले. हे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकारांचे विरुद्ध दिशेने कॅमेऱ्याचे ‘फ्लॅश’देखील चकाकले.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरKavi Suresh Bhat Auditoriamकवी सुरेश भट सभागृह