शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप; चर्चासत्र, गायन व नृत्याने होणार सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 10:52 IST

तीन दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे.

ठळक मुद्देराहुल देशपांडे, सोनाली कुलकर्णी व बेनी दयाल यांचे सादरीकरण

आॅनलाईन लोकमतनागपूर : तीन दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे. १८ डिसेंबर रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशी सकाळी १०.३० ते १२ दरम्यान संत्रा उत्पादक आणि बँकर्स यांच्या भेटीचा (एसएलबीसी) कार्यक्रम होईल. दुपारी १२ ते १ यावेळत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ‘संत्रा शेती : प्रक्रिया, विमा, व्यापार, कृषी पर्यटन, निर्यात आणि जाहिरात’ या मुख्य विषयावर तज्ज्ञ विचार मांडतील. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.ए. निंबाळकर हे परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महा आॅरेंजचे चेअरमेन अनंत घारड, आॅरेंज ग्रोअर असोसिएशन आॅफ इंडिया (ओजीए) चे कार्यकारी अध्यक्ष अमोल तोते, एपीईडीएचे सहायक महाव्यस्थापक प्रशांत वाघमारे, फुड सिक्यूरिटी, अ‍ॅग्रीबिजनेस, पॉलिसी अ‍ॅन्ड प्रोजेक्ट, युपीएलचे उपाध्यक्ष आणि प्रमुख विजय सरदाना, ताज फ्रुट कंपनीचे संचालक ताज खान तसेच महाराष्ट्र  पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे सहभागी होतील.दुपारी २.१५ ते २.३० या वेळेत भू विज्ञान मंत्रालयातर्फे सादरीकरण केले जाणार आहे. २.३० ते २.४५ ई-नाम (नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट)तर्फे सादरीकरण होईल. दुपारी २.४५ वाजता ‘भारतातील संत्रा उद्योग’ या विषयावर सेमीनार आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ४.३० वाजता लुधियाना (पंजाब) येथील फळ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एमआयएस गील हे ‘पंजाबमधील किननॉउ उद्योग’ या विषयावर मार्गदर्शन करतील. महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेच्या उपसंचालिका डॉ. प्रगती गोखले या ‘मेरा मोबाईल मेरा मार्केट’ या विषयावर सादरीकरण करतील. याशिवाय स्विट आॅरेंज रिसर्च स्टेशन, बदनापूर जिल्हा जालनाचे प्रमुख डॉ. एम.बी. पाटील हे ‘महाराष्ट्रतील गोड संत्रा लागवडीच्या अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करतील. एआयसीआरपी आॅन फ्रुट, संत्रावर्गीय संशोधन केंद्र, तिरुपती, आंध्रप्रदेशचे प्रमुख आणि प्रधान वैज्ञानिक डॉ. के. टी. व्यंकटरामन हे ‘आंध्रप्रदेशामध्ये गोड संत्रा लागवडीच्या अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करतील. यादरम्यान ‘नेह भागात खासी संत्रा लागवड’ या विषयावर मिझोरमच्या फलोत्पादन विभागाद्वारे सादरीकरण केले जाणार आहे. ‘उत्कृष्ट लिंबुवर्गीय फळांच्या केंद्राची उपलब्धता’ या विषयावर फलोत्पादन विभाग प्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाच्या फलोत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एम. पंचभाई हे मार्गदर्शन करतील. शेवटी आयआयएचआर, बंगरूळूचे वैज्ञानिक डॉ. पी. त्रिपाठी हे ‘दक्षिण भारतातील कुर्ग संत्रा उद्योग’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता समारोपीय संदेशाद्वारे या महोत्सवाची सांगता होईल.संत्र्याचे शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरात लोकमततर्फे आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टीव्हलचा भाग होणे होणे ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. ग्राहकांना आनंद आणि सकारात्मकता देणाऱ्या कलेला आम्ही नेहमीच प्रोत्साहित केले आहे. या एकमेव अशा महोत्सवातून ‘मास्टरपीस’ निर्माण करणारे नवीन कलावंत बाहेर पडतील आणि आॅरेंज फेस्टिव्हलला नेहमीसाठी संस्मरणीय करतील असा विश्वास आहे.- कोकुयो कॅमलीन

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर