शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक योग दिवस; नितीन गडकरी यांची योगसाधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 10:49 IST

जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका व नेहरू युवा केंद्रातर्फे यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली.

ठळक मुद्देरामभाऊ खांडवे यांचे लाभले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जागतिक योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका व नेहरू युवा केंद्रातर्फे यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग व अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधना केली.नागपुरातील योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे व अन्य पदाधिकाऱ्यांसह गडकरी यांनी विविध योगप्रकार केले. सकाळी ५.४५ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्र

मात उपस्थितांनी योगासनांचे अनेक प्रकार सादर केले. यात लहान मुलांसह अनेक वयोवृद्ध योगाभ्यासी मोठ्या संख्येने हजर झाले होते.

जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाविषयी थोडेसे..कोकणातील सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेले जनार्दनस्वामी हे वेद, उपनिषद, पुराण, यज्ञविधी, आयुर्वेद व ज्योतिषाचार्यात विद्वान. पण त्यांच्यात होता वैराग्यभाव. पुढे काशी व हिमालयात जाऊनही त्यांनी ज्ञान मिळविले. नर्मदेची परिक्रमा करताना त्यांची एका योगगुरूशी भेट झाली व त्यांच्याकडून योगाचे ज्ञान घेतले. याच गुरूने आयुष्यभर नि:शुल्क, नि:स्वार्थपणे समाजपर्यंत जाऊन योगप्रचार करण्याची गुरुदक्षिणा स्वामींकडून मागितली व त्यांनीही इतर सर्व ज्ञान सोडून योग प्रचाराचा मार्ग स्वीकारला. प्रचारासाठी फिरता फिरता ते अमरावतीहून नागपूरला पोहचले व पुढे येथेच त्यांनी आपल्या कार्याचे केंद्र बनविले. त्यावेळी योगाबाबत लोकांना ज्ञान नव्हते. अशावेळी स्वामींनी घरोघरी जाऊन योगाचा प्रचार केला. त्यांनी आजारी व्यक्तींना निवडले व योगसाधनेतून त्यांना बरे केले. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने जनमानसही प्रभावित झाला व त्यांच्याशी जुळत गेला. १९४९ साली त्यांनी नियमित योगवर्ग सुरू केले व १९५१ साली त्यांनी मध्य प्रांत योगाभ्यासी मंडळ ही नोंदणीकृत संस्था स्थापन केली. १९५६ पासून योगाची परीक्षा घेणे सुरू केले व पुढे योग संमेलन भरविण्यास सुरुवात केली. ते आणि एक थैली हेच त्यांचे प्रचार कार्यालय होते. पुढे १९६६ मध्ये त्यांच्या कार्याने प्रभावित होत रामनगर येथील महिलांची संस्था त्यांच्या मंडळाशी विलीन झाली. १९६७ साली स्वामीजींच्या अमृत महोत्सवाच्या वेळी योगाचा बौद्धिक प्रचार करण्यासाठी ‘योगप्रकाश’ या मासिकाला सुरुवात झाली. अनेक लेखक यामध्ये योगाची महिमा लिहू लागले. राज्य शासनाने छत्रपती पुरस्काराने जनार्दनस्वामी यांचा गौरव केला. २ जून १९७८ साली जनार्दनस्वामी यांनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीची प्रेरणा घेत असंख्य लोक या मंडळाच्या कार्याशी जुळले.मंडळाचा विस्तार संपूर्ण राज्यात झाला आहे. ४० हजार सक्रिय साधक आणि ४०० तज्ज्ञ प्रशिक्षक नि:शुल्क मंडळाच्या कामात सेवा देत आहेत. या मंडळाने खºया अर्थाने योगाचे महत्त्व आबालवृद्धांच्या मनामनात प्रवाहित केले आहे.

टॅग्स :Yogaयोग