शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जागतिक निद्रा दिन :पुरेशी झोप न झाल्यास लवकर येते म्हातारपण :सुशांत मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 20:26 IST

पुरेशी झोप न झाल्यास म्हातारपण लवकर येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, म्हातारपणात दिसणारे आजारही लवकर येतात. विशेषत: मधुमेह, रक्तदाब हे आजार वयाच्या ४० किंवा ५० या वर्षात आढळून येतात. याला मानवी शरीरातील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘टेलोमर’ घटक कारणीभूत आहे. ज्यांची झोप चांगली होत नाही त्यांच्यामध्ये हा घटक कमी होत जातो. परिणामी, लवकर वृद्धत्व येते, अशी माहिती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रेस्पीरेटरी व स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.जागतिक निद्रा दिन हा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देरात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तन कॅन्सरचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरेशी झोप न झाल्यास म्हातारपण लवकर येत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, म्हातारपणात दिसणारे आजारही लवकर येतात. विशेषत: मधुमेह, रक्तदाब हे आजार वयाच्या ४० किंवा ५० या वर्षात आढळून येतात. याला मानवी शरीरातील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूला असलेल्या ‘टेलोमर’ घटक कारणीभूत आहे. ज्यांची झोप चांगली होत नाही त्यांच्यामध्ये हा घटक कमी होत जातो. परिणामी, लवकर वृद्धत्व येते, अशी माहिती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रेस्पीरेटरी व स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.जागतिक निद्रा दिन हा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पुरेशी झोप व म्हातारपण यावर झालेल्या संशोधनाची अधिक माहिती देताना डॉ. मेश्राम म्हणाले, वटवाघुळाचे वजन काही ग्रॅममध्ये असते. परंतु हा पक्षी साधारण ४० वर्षे जगतो. यामागील कारणांचा शोध घेतला असता, वटवाघुळमधील ‘डीएनए’च्या दोन्ही बाजूला असलेला ‘टेलोमर’ हा घटक त्याच्या वाढत्या वयानुसार कमी होत नाही, उलट हा घटक कमी होऊ लागताच पुन्हा ‘रिजनरेट’ होतो. यामुळे वटवाघूळ त्याच्या वजनाच्या तुलनेत खूप जास्त वर्षे जगतो. याच्या उलट मानवी शरीरात आहे. वाढत्या वयामुळे ‘टेलोमर’ घटक कमी होतो. परंतु निद्रानाशाचा आजार असेल तर हा घटक लहान होण्याची गती वाढते. यामुळे चांगली झोप आरोग्यासाठी फार महत्त्वाची आहे.कर्करोगाचा धोका १० टक्क्याने वाढतोडॉ. मेश्राम म्हणाले, झोपेचे दोन टप्पे आहेत. एक ‘रेम स्लीप’ व दुसरी ‘नॉन रेम स्लीप’. पहिल्या टप्प्यात पापण्यांची फडफड, स्वप्नं पडणे आदी घडते. दुसऱ्या टप्प्यात पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात. याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना केली जाते. विशेषत: कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात. ही खूप महत्त्वाची व खरी झोप आहे. ही झोप न झाल्यास कर्करोग होण्याची शक्यता असते. रात्रपाळीत, उदा. ‘कॉल सेंटर’मध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण १० टक्क्याने वाढण्याचा धोका असतो.अपुऱ्या झोपेमुळे वंध्यत्वझोपेचे चार चक्र असतात. प्रत्येक चक्र सुमारे ९० मिनिटांची असतात. चौथ्या स्थितीमध्ये ज्याला साखरझोप संबोधतात, यात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. शरीराला लागणारे विविध ‘संप्रेरक’ (हार्मोन्स) तयार होतात. विशेषत: ‘प्रजनन हार्मोन्स’ही तयार होतात. मात्र झोपेच्या चक्रात वारंवार बदल झाल्यास या हार्माेन्स तयार होण्याची प्रक्रिया गडबडते. परिणामी, वंध्यत्वाचा धोका निर्माण होत असल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले.सकाळच्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये निद्रानाशदुपार पाळीच्या तुलनेत सकाळ पाळीतील विद्यार्थ्यांमध्ये निद्रानाशाचे प्रमाण वाढत असल्याचे एका पाहणीत आढळून आल्याचे डॉ. मेश्राम म्हणाले. त्यांच्यानुसार, सकाळ पाळीची शाळा ही साधारण ७.३० ते ८.३० वाजताची असते. बहुसंख्य विद्यार्थी स्कूलबस, व्हॅनमधून शाळेत जात असल्याने त्यांना दोन तास आधी उठून तयारी करावी लागते. ५ ते १२ वर्षाच्या विद्यार्थ्यांना १० तासांच्या झोपेची आवश्यकता असते. परंतु शाळेच्या वेळा पाळाव्या लागत असल्याने सहा ते सात तासांचीच झोप होते. निद्रानाशामुळे लहान मुलांमध्ये स्मृती कमी होणे (मेमरी लॉस) व वाढ खुंटणे आदी समस्या वाढतात.चांगल्या झोपेसाठी हे करा

  • रोज ठरविलेली झोपण्याची व उठण्याची वेळ पाळा
  • दिवसा ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळू झोपू नका
  • झोपेच्या चार तास आधी धूम्रपान व मद्यपान करू नका
  • झोपेच्या सहा तास आधी चहा, कॉफी किंवा उत्तेजित करणारे पेय घेऊ नका
  • झोपण्याच्या चार तास आधी हलके जेवण घ्या
  • रोज व्यायाम करा, झोपण्याअगोदर व्यायम करू नका
  • झोपायचा बिछाना आरामदायक असावा
  • आवाज किंवा उजेडामुळे झोप भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी

 

 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर