शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल; कोरियातील संत्रा उत्पादन वेगात घटत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:35 IST

कोरियातील संत्रा उत्पादन वाढण्याऐवजी सतत कमी होत आहे, अशी खंत जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील हॉर्टिकल्चर प्लांट जेनेटिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. क्वान जेओंग सांग यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे प्रा. सांग यांची खंत कोरियात संत्र्याची शेती सोपी नसल्याचे स्पष्ट केले

सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनाप्रमाणे किंमत मिळत नसल्यामुळे कोरियातील शेतकरी संत्रा उत्पादनाबाबत फारसे उत्सुक नाहीत. परिणामी,कोरियातील संत्रा उत्पादन वाढण्याऐवजी सतत कमी होत आहे, अशी खंत जेजू नॅशनल युनिव्हर्सिटीतील हॉर्टिकल्चर प्लांट जेनेटिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे प्राध्यापक डॉ. क्वान जेओंग सांग यांनी व्यक्त केली.‘लोकमत’च्या पुढाकाराने वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये शुक्रवारी त्यांनी ‘लोकमत’शी संत्रा उत्पादनासंदर्भात विस्तृत चर्चा केली. कोरियातील जेजू द्वीप येथे २० हजार हेक्टर जमिनीवर मॅन्डरीन जातीच्या संत्र्याची शेती केली जाते. कोरियात ७ लाख टन संत्र्यांची मागणी आहे. परंतु, उत्पादन केवळ ६ लाख टन होते. उर्वरित एक लाख टन संत्री अमेरिकेतून आयात केली जातात. याशिवाय कोरियात आंबे, केळी व अन्य फळांची आयात केली जाते. कोरियातील नागरिकांना इतर फळे आवडायला लागली आहेत. ते इतर फळांकडे आकर्षित झाले आहेत. त्यामुळे मॅन्डरीन संत्र्याची मागणी वेगात कमी होत आहे. परिणामी, किंमत कमी होऊन ३ ते ५ डॉलर किलो झाली आहे. त्या कारणाने शेतकऱ्यांना संत्र्याची शेती करणे नुकसानकारक झाले आहे अशी माहिती डॉ. सांग यांनी दिली. कोरियामध्ये अमेरिका व ब्राझिल येथून संत्रा ज्युस, जॅम व जेलीचेसुद्धा आयात होते. कोरियामध्ये मॅन्डरीन संत्र्याला ओन्जुमी लेगन म्हटले जाते. या संत्र्याची साल मऊ असते. हे संत्र खाण्यास गोड व रसदार आहे. परंतु, पसंती कमी होत आहे याकडे डॉ. सांग यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल