शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

World orange festival Nagpur : ही व्यंजने काय काय बनते संत्र्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 20:36 IST

संत्र्याचा ज्यूस, संत्र्याची बर्फी यापलीकडे तिसरे व्यंजन कदाचित आपल्याला आठवत नसेल. पण संत्र्यापासून कित्येक व्यंजन बनू शकतात, हे वर्ल्ड ऑरेज फेस्टिव्हलनिमित्त आयोजित कुकिंग स्पर्धेत हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व श्री बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड कॅटरिंंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी संत्र्याचे किमान ५० व्यंजन बनविले. 

ठळक मुद्देसंत्र्याच्या रेसिपीची दरवळ: हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी बनविले विविध पदार्थ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्र्याचा ज्यूस, संत्र्याची बर्फी यापलीकडे तिसरे व्यंजन कदाचित आपल्याला आठवत नसेल. पण संत्र्यापासून कित्येक व्यंजन बनू शकतात, हे वर्ल्ड ऑरेज फेस्टिव्हलनिमित्त आयोजित कुकिंग स्पर्धेत हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व श्री बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅन्ड कॅटरिंंग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी संत्र्याचे किमान ५० व्यंजन बनविले. 

या कुकिंग स्पर्धेमुळे दोन्ही कॉलेज संत्र्याच्या सुगंधानी दरवळत होते. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला होता. उपराजधानीत सुरूअसलेल्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल विद्यार्थ्यांसाठीही उत्साह व उत्सुकतेचा विषय ठरतो आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी म्हणाले की, नागपूर संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते. संत्रा ही थीम ठेवून ही स्पर्धा होत असल्यामुळे, आमच्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखविण्याचे चॅलेंज होते. संत्र्यापासून काहीतरी नवीन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी संत्र्यापासून नारिंगी केक, आरेंज डिलाईट, ऑरेंज चॉकलेट, ऑरेंज चिकन टिक्का, ऑरेंज स्वॉफ्टी, ऑरेंज खीर, रसमलाई, शाही पुलाव, ऑरेंज जेली, नान चपाती (रोटी) असे जवळपास तीन वेगवेगळे व्यंजन विद्यार्थ्यांनी तयार केले होते. कॉलेजच्या हॉलमध्ये सर्व व्यंजन विद्यार्थ्यांनी आकर्षकपणे सजविले होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. एस. थोरात, विभागप्रमुख आरती मेश्राम, शेफ नितीन शेंडे, मृणाल रामटेके, माधवी शेंडे, अन्नु पिल्लई यांनी परीक्षक म्हणून पाहणी केली. 
श्री बाळासाहेब तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरींग टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा रेसिपी कॉन्टेंस्टमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑरेंज अ‍ॅपल स्ट्रडल, ऑरेंज पाई, ऑरेंज पास्ता, ऑरेंज मोमोज, ऑरेंज पेन केक सह ३० प्रकारचे व्यंजन तयार केले होते. परीक्षक म्हणून कॉलेजचे प्रा. योगेश मेश्राम, डॉ. अनिल सोनटक्के, अंकित केनेकर, अंकुश त्रिपाठी यांनी पाहणी केली. कुकिंग वर्कशॉपसाठी यांची झाली निवडप्रत्येक कॉलेजमधून ५ विद्यार्थ्यांची २१ जानेवारी रोजी होणाऱ्या शेफ गौतम महर्षी यांच्या कुकिंग वर्कशॉपसाठी निवड करण्यात आली. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथून अक्षय हळबे, शुभम शाहू, क्लारेन्स धुर्वे, कृषभ मंडलिक, अफराज रंगवाला या विद्यार्थ्यांची निवड झाली. तर तिरपुडे कॉलेजमधून स्वप्निला चक्रवर्ती, हाशीम खान, फैजुल्लाह खान, विशेष बाहेश्वर, मेघा वांढरे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेतून विद्यार्थ्यांची कल्पकता पुढे आलीवर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल निमित्त आयोजित या पाककृती स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची कल्पकता पुढे आली, शिवाय संत्र्यापासून कित्येक नवनवीन प्रकारचे व्यंजन तयार होऊ शकतात, हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. ही स्पर्धा हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणार आहे, असे मत कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी.एस. थोरात व प्राचार्य सतीश नायडू यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरReceipeपाककृती